Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रेशर कुकरचा स्फोट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ५ संकेत! वेळीच सावध व्हा नाहीतर होईल गंभीर अपघात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2026 13:06 IST

mistakes to avoid while using pressure cooker : kitchen safety tips pressure cooker : pressure cooker blast reasons : प्रेशर कुकर फुटण्यामागे तुमच्या 'या' ५ सवयी आहेत कारणीभूत...

स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाचं आणि कामाचा वेग वाढवणारं उपकरण म्हणजे 'प्रेशर कुकर'. मात्र, याचा वापर करताना थोडी जरी हलगर्जी झाली, तर त्याचं रूपांतर मोठ्या अपघातात होऊ शकतं. कुकरचा स्फोट होण्याच्या बातम्या आपण अनेकदा ऐकतो, ज्यामुळे भीती वाटणं स्वाभाविक आहे. स्वयंपाकघरातील प्रेशर कुकर हा वेळ वाचवणारा आणि सोयीचा उपकरण असला, तरी त्याचा चुकीचा वापर धोकादायक ठरू शकतो. कधीकधी कुकर फुटण्याच्या घटना ऐकायला मिळतात, ज्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता असते. मात्र, अशा घटना बहुतांश वेळा काही साध्या चुका किंवा दुर्लक्षामुळे घडतात. योग्य काळजी आणि माहिती असल्यास हा धोका सहज टाळता येऊ शकतो(mistakes to avoid while using pressure cooker).

प्रेशर कुकरचा चुकीचा वापर, देखभालीकडे दुर्लक्ष किंवा लहानसहान चुका यामुळे मोठा धोका निर्माण होऊन अपघात होऊ शकतो. त्यामुळे या कारणांची योग्य माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. स्वयंपाकघरातील सर्वात उपयुक्त प्रेशर कुकर आपला वेळ वाचवतो खरा, पण तोच कुकर कधी 'बॉम्ब'सारखा फुटेल याचा आपण विचारही करत नाही. प्रेशर कुकरचा स्फोट होणे ही केवळ तांत्रिक चूक नसून ती जिवावर बेतणारी दुर्घटना ठरू शकते. अनेकदा आपण कुकर लावताना काही छोट्या गोष्टींकडे (pressure cooker blast reasons) दुर्लक्ष करतो आणि हीच छोटी चूक मोठ्या स्फोटाला आमंत्रण देते. प्रेशर कुकर फुटण्यामागची (kitchen safety tips pressure cooker) ५ मुख्य कारणं कोणती आहेत आणि त्यापासून कसं सावध राहता येईल याची माहिती पाहूयात. 

प्रेशर कुकर फुटण्याची ५ मुख्य कारणं कोणती आहेत ?

१. झाकणाचे लॉक खराब असणे :- जर कुकरचे लॉक व्यवस्थित काम करत नसेल, तर वाफ तयार होत असताना किंवा शिट्टी वाजताना अचानक झाकण उडून मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे कुकर गॅसवर ठेवण्यापूर्वी त्याचे झाकण नीट बसले आहे की नाही आणि लॉक कुठे डॅमेज तर नाही ना, हे नेहमी तपासून घ्यावे.

दिवसभर ए.सी-पंखा सुरू असूनही खोली 'भट्टी'सारखी तापतेय? उन्हाळ्यात घर गार ठेवण्यासाठी करा 'हे' ३ स्मार्ट बदल....

माठातलं पाणी प्रत्येकवेळी आरोग्यासाठी अमृत नसतं! 'या' ८ लोकांनी चुकूनही पिऊ नये - मिळेल आजारांना निमंत्रण... 

२. क्षमतेपेक्षा जास्त साहित्य भरणे :- प्रत्येक कुकरची एक ठराविक मर्यादा असते. जेव्हा तुम्ही कुकरमध्ये डाळ, तांदूळ किंवा इतर साहित्य काठोकाठ भरता, तेव्हा वाफ बाहेर पडायला जागा उरत नाही. यामुळे कुकरमध्ये अंतर्गत दाब (Pressure) प्रमाणाबाहेर वाढतो आणि स्फोट होण्याची भीती असते. त्यामुळे कुकर कधीही पूर्ण भरण्याची चूक करू नका.

३. अतिशय कमी पाणी घालणे :- बऱ्याच लोकांना असं वाटतं की कुकरमध्ये पाणी कमी झालं तर फक्त अन्न जळेल किंवा भांड्याला चिटकेल. पण, पाणी खूपच कमी असेल तर कुकरमध्ये कोरडी वाफ तयार होऊन दाब प्रचंड वाढतो, ज्यामुळे कुकर फुटू शकतो. म्हणूनच, कुकर लावताना नेहमी साहित्याच्या प्रमाणात मोजून पाणी टाकावे.

तुमच्या ९ सवयी ऑफिसमध्ये तुम्हाला करतात बदनाम! करिअर होण्यापूर्वीच संपेल-करा ‘हे’ बदल आजच...

४. वाफ पूर्णपणे निघण्यापूर्वी कुकर उघडण्याचा प्रयत्न करणे :- अनेकदा आपल्याला खूप घाई असते, त्यामुळे कुकरमधील वाफ नैसर्गिकरित्या बाहेर निघेपर्यंत आपण वाट पाहत नाही. झाकण जबरदस्तीने उघडण्याचा प्रयत्न करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. अशा वेळी प्रचंड दाबाने गरम वाफ आणि अन्न अंगावर उडून गंभीर भाजण्याची किंवा कुकरचा स्फोट होण्याची शक्यता असते. त्यामुळे गॅस बंद केल्यानंतर वाफ पूर्णपणे निघेस्तोवर संयम ठेवा.

५. कुकरमधील बिघाडाकडे दुर्लक्ष करणे :- कुकर 'एअरटाईट' ठेवण्यासाठी त्याची रबर रिंग (Gasket) आणि शिट्टीची नळी (Vent Tube) सुस्थितीत असणे गरजेचे आहे. जर रिंग सैल झाली असेल किंवा तिची क्वालिटी खराब असेल, तर ती अचानक फाटून कुकर फुटू शकतो. याशिवाय, सेफ्टी व्हॉल्व्ह (Safety Valve) आणि वेंटिंग सिस्टममध्ये काही बिघाड असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका; कारण ही छोटीशी चूक मोठ्या अपघाताला निमंत्रण देऊ शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : Pressure cooker blast: 5 warning signs to watch out for!

Web Summary : Pressure cookers save time, but negligence can cause explosions. Check lid locks, avoid overfilling, use adequate water, release pressure naturally, and maintain cooker parts for safety.
टॅग्स :अन्नकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.