लोणचं, चटणी हे अनेकांचे अतिशय आवडीचे पदार्थ. जेवणात एकवेळ एखादी पोळी किंवा थोडी भाजी, आमटी कमी असेल तरी चालेल. पण तोंडी लावायला चटणी, लोणचं हवंच असेही काही खवय्ये असतात. आता आपल्या नेहमीच्या त्याच त्या चवीच्या चटण्या आणि लोणची खाऊन थोडं कंटाळला असाल आणि चवीमध्ये बदल हवा असेल तर मिरचीचे 'टिपोरे' ही एक राजस्थानी रेसिपी (Rajasthani Food) ट्राय करून पाहा (how to make mirchi ke tipore?). रेसिपी अगदी सोपी असून मिरचीच्या लोणच्याचाच तो एक थोडा वेगळा प्रकार आहे, असं म्हटलं तरी चालेल.(mirch ke tipore recipe)
साहित्य
कमी तिखट असणारी हिरवी मिरची पावशेर
अर्धा टीस्पून हळद, धनेपूड, जिरेपूड, बडिशेप पावडर
१ टीस्पून लाल तिखट
केस छोटे असो किंवा मोठे... 'या' हेअर ॲक्सेसरीज वापरा, हेअरस्टाईल मस्त होऊन सगळ्यांत उठून दिसाल
३ टेबलस्पून मोहरीचं तेल
अर्धा टीस्पून जिरे आणि मोहरी
पाव टीस्पून कलौंजी
चवीनुसार मीठ, काळंमीठ आणि अर्धा टीस्पून आमचूर पावडर
कृती
ही रेसिपी करण्यासाठी कमी तिखट आणि कमी बिया असणाऱ्या मिरच्या घ्यावा. यानंतर मिरच्या धुवून स्वच्छ पुसून घ्या आणि त्यांना मध्यम आकारात चिरून घ्या.
यानंतर एका भांड्यामध्ये हळद, धनेपूड, जिरेपूड, बडिशेप पावडर, लाल तिखट असं सगळं एकत्र करा.
यानंतर गॅसवर एक लहान कढई गरम करायला ठेवा. तिच्यामध्ये मोहरीचं तेल घाला. तुम्ही दुसरं तेलही वापरू शकता. पण मोहरीच्या तेलामध्ये केलेले टिपोरे जास्त चवदार लागतात. जेव्हा तेल गरम होईल तेव्हा मोहरी, जिरे, कलौंजी घालून फोडणी करून घ्या.
छातीत जळजळ होऊन घशात आंबट पाणी येतं? ४ उपाय करून पाहा- ॲसिडीटी लगेच कमी होईल
फोडणी झाल्यानंतर त्याच्यामध्ये मिरच्या आणि सगळा सुका मसाला घाला. चवीनुसार मीठ, काळं मीठ आणि आमचूर पावडर घालावी.
दोन ते तीन मिनिटे कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर मिरची वाफवून घ्यावी. यानंतर गॅस बंद करा. मिरचीचे टिपोरे तयार.. या मिरच्या एखाद्या एअर टाईट कंटेनरमध्ये घालून फ्रिजमध्ये ठेवल्यास ८ ते १० दिवस चांगल्या टिकतात.