हिवाळा आला की बाजारात भरपूर प्रमाणात हिरव्या पालेभाज्या येतात. एरवी कधीही नसतात एवढ्या ताज्या भाज्या या दिवसांत असतात. त्यामुळे त्या घेऊन त्यांच्यापासून वेगवेगळे पदार्थ करण्याचा मोह होतोच. आता हिरवीगार मेथीची जुडी जर तुम्ही आणली तर एकदा पुढे सांगितलेल्या रेसिपीनुसार मेथी- पनीर पराठा करून पाहा. हा पराठा चवीला अतिशय उत्तम असतो. शिवाय त्यात असणाऱ्या मेथी आणि पनीरमुळे त्यातून भरपूर प्रमाणात फायबर आणि प्रोटीन्स मिळतात (Winter Special Recipe of Methi Paneer Paratha). मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणातही तुम्ही मेथी पनीर पराठा खाऊ शकता.(methi paneer paratha recipe)
मेथी पनीर पराठा रेसिपी
साहित्य
२ ते ३ वाट्या ताजी हिरवीगार मेथीची पाने
२ वाट्या कणिक
१ चमचा आलं, लसूण, मिरची पेस्ट
चेहऱ्यावरचे पिंपल्स, ओपन पोअर्स वाढले? बघा तुळशीच्या पानांचा बिनपैशाचा उपाय- रातोरात त्वचा चमकेल..
१ वाटी किसलेलं पनीर
धनेपूड, जिरेपूड प्रत्येकी एकेक चमचा
एका लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ
कृती
मेथी पनीर पराठा करण्यासाठी सगळ्यात आधी मेथी स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर ती बारीक चिरून घ्या. यानंतर एका भांड्यामध्ये कणिक घ्या. तिच्यामध्ये बारीक चिरलेली मेथी आणि चवीनुसार मीठ घाला. यानंतर पराठे करण्यासाठी कणिक मळतो तसे पीठ मळून घ्या आणि तेल लावून ते १० ते १५ मिनिटे झाकून ठेवा.
कॅल्शियमसाठी दुधाचाच आग्रह कशाला? दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम देणारे ५ पदार्थ खा, हाडं राहतील बळकट
आता पनीर किसून घ्या. किसलेल्या पनीरमध्ये आलं, लसूण, मिरचीची पेस्ट, धणेपूड, जिरेपूड, लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घाला. सगळं मिश्रण हाताने कालवून एकजीव करून घ्या. आता भिजवलेल्या पिठाचा एक छोटा गोळा घेऊन तो पुरीएवढा लाटा. त्यात तयार केलेलं पनीरचं सारण भरा आणि नेहमीप्रमाणे आलू पराठे लाटतो तसेच मेथी पनीर पराठे लाटून तव्यावर खमंग भाजून घ्या. हे पराठे लोणी, तूप, लोणचं, सॉस या पदार्थांसोबत खायला खूप छान लागतात. एकदा ट्राय करून पाहा.
