lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > मेथीच्या भाजीच्या देठांची चटपटीत चटणी, एकदा खाऊन पाहाल तर नेहमीच कराल- बघा सोपी रेसिपी 

मेथीच्या भाजीच्या देठांची चटपटीत चटणी, एकदा खाऊन पाहाल तर नेहमीच कराल- बघा सोपी रेसिपी 

Methi Chutney Recipe: मेथीची भाजी निवडताना आपण पानं काढून घेतो आणि देठं मात्र टाकून देतो. आता त्याच देठांची चविष्ट चटणी करून पाहा. (How to make delicious chutney from leftover methi stem)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2024 03:25 PM2024-03-14T15:25:53+5:302024-03-14T15:26:33+5:30

Methi Chutney Recipe: मेथीची भाजी निवडताना आपण पानं काढून घेतो आणि देठं मात्र टाकून देतो. आता त्याच देठांची चविष्ट चटणी करून पाहा. (How to make delicious chutney from leftover methi stem)

Methi chutney recipe, How to make delicious chutney from leftover methi stem, green methi chutney recipe | मेथीच्या भाजीच्या देठांची चटपटीत चटणी, एकदा खाऊन पाहाल तर नेहमीच कराल- बघा सोपी रेसिपी 

मेथीच्या भाजीच्या देठांची चटपटीत चटणी, एकदा खाऊन पाहाल तर नेहमीच कराल- बघा सोपी रेसिपी 

Highlightsखमंग आणि अतिशय चवदार लागणारी ही चटणी तुम्ही पोळी, भाकरी, पराठ्यासोबत खाऊ शकता किंवा मग जेवणात तोंडी लावायला घेऊ शकता.

मेथीची भाजी, मेथीचे पराठे, मेथी घालून केलेले वरण, मेथीचे मुटके असे अनेक पदार्थ आपण नेहमीच करतो. पण हे पदार्थ करतान मेथीची पानं आणि पानांच्या खालची थोडीशी काडी वापरतो आणि देठं मात्र टाकून देतो. पण या देठांची खूप छान चटणी करता येते (How to make delicious chutney from leftover methi stem). खमंग आणि अतिशय चवदार लागणारी ही चटणी तुम्ही पोळी, भाकरी, पराठ्यासोबत खाऊ शकता किंवा मग जेवणात तोंडी लावायला घेऊ शकता (Methi chutney recipe). बघा मेथीच्या देठांची झणझणीत चटणी कशी करायची...(green methi chutney recipe)

मेथीच्या भाजीच्या देठांची चटणी करण्याची रेसिपी 

 

चटणी करण्यासाठी मेथीच्या भाजीचे देठं कसे वापरायचे आणि त्यांची चवदार चटणी कशी करायची, याची रेसिपी home_sattva या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. 

साहित्य

मेथीच्या भाजीची देठं

सुप्रीम कोर्टाच्या कॅन्टीनमधील 'स्वयंपाकी' वडिलांच्या लेकीची कमाल! सरन्यायाधीशांसह सर्वच न्यायमूर्तींनी दिली शाबासकी, कारण.... 

२ ते ३ हिरव्या मिरच्या

१ टीस्पून जिरे

२ टेबलस्पून खोबऱ्याचा किस

१ टेबलस्पून चिंचेचा कोळ 

चवीनुसार मीठ 

फोडणीसाठी तेल, मोहरी आणि हिंग

 

कृती

१. सगळ्यात आधी मेथीच्या भाजीची देठं स्वच्छ धुवून घ्या. पुसून चांगली कोरडी करा.

२. कढई गॅसवर गरम करायला ठेवा. त्यात जिरे टाका आणि भाजून घ्या. यानंतर खाेबऱ्याचा किसही भाजून घ्या. 

परीक्षेच्या काळात मुलांना ३ पदार्थ खायला द्या, स्मरणशक्ती- एकाग्रता वाढेल, पेपर सोपे जातील...

३. नंतर कढईमध्ये थोडं तेल टाका आणि मेथीची देठं, हिरव्या मिरच्या परतून घ्या. 

४. हे सगळं मिश्रण थंड झालं की ते मिक्सरमध्ये टाका. त्यात चिंचेचा कोळ घाला आणि अगदी बारीक वाटून घ्या. 

५. ही चटणी आता एका वाटीत काढून घ्या. त्यात चवीनुसार मीठ घाला. मेथीच्या देठाची चटणी झाली तयार.

६. तुम्हाला आवश्यकता वाटली आणि आवडत असेल तर या चटणीला वरतून फोडणी घाला. नाही घातली तरी चालते. 


 

Web Title: Methi chutney recipe, How to make delicious chutney from leftover methi stem, green methi chutney recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.