Lokmat Sakhi >Food > हिरव्याकंच कैरीचा करा आंबट- गोड चटपटीत मेथांबा! चवीत बदल होऊन जेवणात येईल रंगत

हिरव्याकंच कैरीचा करा आंबट- गोड चटपटीत मेथांबा! चवीत बदल होऊन जेवणात येईल रंगत

Methamba Recipe In Marathi: कैरीच्या दिवसांना नुकतीच सुरुवात झालेली आहे. त्यामुळे चटपटीत आंबट- गोड चवीचा मेथांबा तर झालाच पाहिजे.. (how to make methamba from raw mango?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2025 13:25 IST2025-03-18T13:25:00+5:302025-03-18T13:25:50+5:30

Methamba Recipe In Marathi: कैरीच्या दिवसांना नुकतीच सुरुवात झालेली आहे. त्यामुळे चटपटीत आंबट- गोड चवीचा मेथांबा तर झालाच पाहिजे.. (how to make methamba from raw mango?)

methamba recipe in Marathi, how to make methamba from raw mango, kayras or methamba recipe | हिरव्याकंच कैरीचा करा आंबट- गोड चटपटीत मेथांबा! चवीत बदल होऊन जेवणात येईल रंगत

हिरव्याकंच कैरीचा करा आंबट- गोड चटपटीत मेथांबा! चवीत बदल होऊन जेवणात येईल रंगत

Highlightsमेथांबा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. फ्रिजशिवायही तो ८ ते १० दिवस चांगला टिकतो

उन्हाळा सुरू झाला आणि बाजारात हिरव्याकंच कैऱ्या दिसायला लागल्या. सुरुवातीला कैरीचा भाव जास्त होता. पण आता मात्र सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात कैऱ्या मिळत आहेत. त्यामुळे कैरीचे वेगवेगळे पदार्थ करून त्यांचा आस्वाद घेण्यास हरकत नाही. कैरीचा असाच एक उन्हाळी स्पेशल चटकदार आणि चटपटीत पदार्थ म्हणजे मेथांबा (how to make methamba from raw mango?). बऱ्याच ठिकाणी मेथांबा करण्याच्या  वेगवेगळ्या पद्धती पाहायला मिळतात (Methamba Recipe In Marathi). त्यापैकी ही एक सगळ्यात सोपी आणि लवकर होणारी रेसिपी पाहूया...

कैरीचा मेथांबा करण्याची रेसिपी

 

साहित्य 

१ मोठ्या आकाराची कैरी 

२ ते ३ टीस्पून लाल तिखट 

१ टी स्पून जिरेपूड

डोक्यातल्या कोंड्यामुळे वैतागलात? ही ४९ रुपयांची वस्तू आणा- कोंडा कायमचा निघून जाईल

पाऊण वाटी गुळ

चवीनुसार मीठ 

२ टीस्पून मेथ्या

फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग आणि चिमूटभर हळद 

 

कृती 

सगळ्यात आधी कैरी स्वच्छ धुऊन घ्या आणि तिच्या देठाकडचा भाग कापून टाका. 

यानंतर कैरीची सालं काढून घ्या आणि तिचे बारीक काप करा.

कुंडीतला कडिपत्ता सारखा सुकून जातो? ३ टिप्स- जोमात वाढून हिरवागार- भरगच्च होईल

आता गॅसवर कढई गरम करायला ठेवा. कढईमध्ये तेल घाला. तेल तापल्यानंतर मोहरी घाला. मोहरी तडतडल्यानंतर मेथ्या घाला. मेथ्या जळणार नाहीत याची काळजी घ्या. यानंतर हिंग आणि हळद घाला.

फोडणी झाल्यानंतर कैरीच्या फोडी कढईमध्ये घाला आणि व्यवस्थित परतून घ्या. परतून झाल्यानंतर कढईवर झाकण ठेवा आणि ३ ते ४ मिनिटे कैरीच्या फोडी वाफवून घ्या.

यानंतर चमचाने हलकेसे दाबून कैरी मऊ पडली आहे की नाही ते तपासून घ्या. कैरी मऊ झाली असेल तरच त्यामध्ये गुळ घाला. कारण कैरीच्या फोडी कडक असताना जर त्यात गूळ घातला तर फोडी वातड होतात. 

 

कढईमध्ये गूळ घातल्यानंतर त्याचा पाक होतो. या पाकामध्येच लाल तिखट, जिरेपूड तसेच मीठ घाला. अधूनमधून चमच्याने हलवत राहा.

खूप आंबट झालेलं दही खाल्लं जात नाही? ४ चवदार पदार्थ करून खा- घ्या सोप्या रेसिपी

पाक जेव्हा बऱ्यापैकी आटून जाईल तेव्हा गॅस बंद करा. पुन्हा एकदा कढईवर झाकण ठेवा आणि थोडी वाफ येऊ द्या. मेथांबा झाला तयार. हा मेथांबा थंड झाल्यानंतर काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. फ्रिजशिवायही तो ८ ते १० दिवस चांगला टिकतो


 

Web Title: methamba recipe in Marathi, how to make methamba from raw mango, kayras or methamba recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.