Join us

Masala Strawberry : आता हेच बाकी होतं! मसाला स्ट्रॉबेरीचा विचित्र प्रयोग पाहून नेटकरी भडकले; पाहा व्हायरल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 16:36 IST

Masala Strawberry Social Viral : काही प्रयोग खूपच किळसवाणे असतात तर काही कॉम्बिनेशन्समुळे नेटिझन्सचा पारा चढतो. सोशल मीडियावर सध्या मसाला स्ट्रॉबेरीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही नवल वाटेल. 

फळं आपल्या शरीरासाठी खूप चांगली असतात याची तुम्हाला कल्पना असेलच. जे लोक रोज फळं खातात ते इतरांच्या तुलनेत अधिक एक्टिव्ह, शारीरिकदृष्या फीट असतात.  खाद्यपदार्थांमध्ये केलेले वेगवेगळे प्रयोग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही प्रयोग खूपच किळसवाणे असतात तर काही कॉम्बिनेशन्समुळे नेटिझन्सचा पारा चढतो. सोशल मीडियावर सध्या मसाला स्ट्रॉबेरीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही नवल वाटेल. 

या व्हिडीओतील विक्रेता स्ट्रॉबेरी  (Strawberry)  सारख्या गोड पदार्थाबरोबर काहीतरी विचित्र प्रयोग करताना दिसतोय. हा मसाला स्ट्रॉबेरीचा हा प्रयोग अनेकांना आवडला नाही. त्यामुळे लोकांनी सोशल मीडियावर राग काढण्यास सुरुवात केली. तेव्हापासून हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झालं.

बाबौ! मुलाला गादीवर फेकायला गेली अन् आईनं मोठी चूक केली; नेटिझन्सना हसू आवरेना

या व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे की प्रथम एक व्यक्ती स्ट्रॉबेरी  (Strawberry) धुत आहे. मग तो स्ट्रॉबेरी कापतो आणि एका डब्यामध्ये ठेवतो. यानंतर या  लांब डब्यात बरेच मसाले मिसळतो. मसाले स्ट्रॉबेरीला लागण्यासाठी ही व्यक्ती बंद डबा जोरदारपणे हलवते. त्यानंतर डबा उघडून तयार केलेली मसाला स्ट्रॉबेरी ग्राहकांसमोर सर्व्ह केली जाते.

 राता लंबिया गाण्यावर टांझानियाच्या बहिण भावाचा जबरदस्त डान्स; पाहा व्हायरल व्हिडीओ

याआधीही सोशल मीडियावर फॅन्टा मॅगीचा फोटो व्हायरल झाला होता. यात गाझियाबादमधील एक स्ट्रीट फूड विक्रेता हा अत्यंत सोपी पण आगळी वेगळी डीश बनवताना दिसून आला.फॅन्टा मॅगीचा हा व्हिडीओ 18 नोव्हेंबरला शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओला सुमारे 2.8 दशलक्ष व्हिव्हज मिळाले होते. तर या व्हिडीओवर लोकांनी खूप कमेंट्सचा वर्षावही केला आहे. काही फूड ब्लॉगर्सनी सहमती दर्शवली आणि डिश चांगली चव येईल असे वाटले, तर इतरांनी असहमत दर्शवली

या व्हिडीओमध्ये ब्लॉगर इतर फ्यूजन पदार्थांची नावे देखील देतो जे लोक पचवू शकत नाहीत. तो गमतीने पुढे म्हणतो की ‘लोक ओरियो बरोबर फ्रिटर बनवतात, कोका कोलामध्ये दूध मिसळतात आणि फॅन्टासह मॅगी तयार करतात, जगाचा अंत जवळ आला आहे.

टॅग्स :अन्नपाककृतीसोशल व्हायरल