Lokmat Sakhi >Social Viral > Social Viral : बाबौ! मुलाला गादीवर फेकायला गेली अन् आईनं मोठी चूक केली; नेटिझन्सना हसू आवरेना

Social Viral : बाबौ! मुलाला गादीवर फेकायला गेली अन् आईनं मोठी चूक केली; नेटिझन्सना हसू आवरेना

Social Viral : 'पॅरेंटिंग फेल' असे लिहिलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू  शकता एक महिला दुकानात खरेदी करत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 05:48 PM2021-11-28T17:48:56+5:302021-11-28T18:03:12+5:30

Social Viral : 'पॅरेंटिंग फेल' असे लिहिलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू  शकता एक महिला दुकानात खरेदी करत आहे. 

Social Viral : Viral video mother throws baby into pile of pillows instagram funny | Social Viral : बाबौ! मुलाला गादीवर फेकायला गेली अन् आईनं मोठी चूक केली; नेटिझन्सना हसू आवरेना

Social Viral : बाबौ! मुलाला गादीवर फेकायला गेली अन् आईनं मोठी चूक केली; नेटिझन्सना हसू आवरेना

आपलं बाळ म्हणजे कोणत्याही आईचा जीव की प्राण. बाळासोबत मस्ती करताना असं काही होईल असा या महिलेनं विचारही केला नव्हता. सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे जे पाहून आधी लोकांच्या काळजाचा ठोका चुकला नंतर चांगलाच हशा पिकला . हा व्हिडिओ अॅना न्यूटन नावाच्या महिलेने पोस्ट केला आहे. जिचे इंस्टाग्रामवर 10.8k पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. 'पॅरेंटिंग फेल' असे लिहिलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू  शकता एक महिला दुकानात खरेदी करत आहे. 

जेव्हा ती कुशनच्या एका मोठ्या बॉक्सजवळ असते तेव्हा ती तिच्या प्रिय मुलाला आनंद देण्याचा प्रयत्न करते. व्हिडीओमधला हा चिमुरडा १ वर्षापेक्षाही लहान असल्याचं दिसून येतंय.व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता ही महिला आपल्या मुलाला उशांच्या ढीगाऱ्यावर फेकते पण चुकून तो चिमुकला खाली जातो, उश्यावर पडत नाही.  घाबरलेली आई मग आपल्या मुलाला  वर उचलण्याचा प्रयत्न करते. 

तिचा मुलगा सुदैवाने पूर्णपणे बरा असल्याचं तिला कळल्यावर तिच्या चेहऱ्यावर समाधानाची झलक दिसते. नंतर आपल्या बाळाला घट्ट मिठी मारून ती हसते. शेवटी बाळाच्या चेहऱ्यावरील हास्य ही खरोखरच सर्वात मजेदार आणि गोंडस गोष्ट आहे. इन्स्टाग्राम युजर्सनी हसणाऱ्या इमोजीसह कमेंट्स केल्या आहेत. 

Web Title: Social Viral : Viral video mother throws baby into pile of pillows instagram funny

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.