Join us

मारवाड स्टाईल लसूण चटणी! चाखून पाहताच म्हणाल वाह वाह.. घ्या ५ मिनिटांत होणारी सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2025 16:10 IST

Garlic Chutney Recipe: जेवणात तोंडी लावायला काही नसेल तर मारवाड स्टाईलची लसूण चटणी एकदा चाखून पाहाच...(how to make rajasthani style garlic chutney?)

ठळक मुद्देही चटणी एअर टाईट डब्यामध्ये ठेवल्यास १० ते १५ दिवस चांगली टिकते. या चटणीला तुम्ही वरून फोडणी देऊनही खाऊ शकता. 

जेवणाची रंगत तेव्हाच वाढत जाते जेव्हा जेवणात तोंडी लावण्यासाठी इतरही काही पदार्थ असतात. त्यामुळे चटणी, लोणचं असे पदार्थ आपण आवर्जून करतच असतो. आता आपल्याकडच्या शेंगदाणे, तीळ, जवस, खोबरे अशा पारंपरिक चटण्या आपण नेहमीच खातो. त्यात कधीतरी थोडा बदल करावासा वाटतोच.. अशावेळी ही मारवाड स्टाईलची लसूण चटणी करून पाहा. ही चटणी करायला अतिशय सोपी आहे. शिवाय ती खूप झटपट होते (how to make rajasthani style garlic chutney?). मारवाड प्रांतात डाळ बट्टी किंवा मग भाकरी यांच्यासोबत तोंडी लावायला ही चटणी केली जाते. ती कशी करायची ते पाहूया...(marwad style lasun chutney in 5 minutes)

 

मारवाड स्टाईलची लसूण चटणी रेसिपी

८ ते १० लसूण पाकळ्या

८ ते १० सुकलेल्या लाल मिरच्या

व्हिटॅमिन बी १२ वाढण्यासाठी २ घरगुती शाकाहारी पदार्थ- बी १२ ची कमतरता भरून काढणारे साधेसोपे उपाय

१ चमचा आमचूर पावडर

१ चमचा जिरे

२ टेबलस्पून तेल

चवीनुसार मीठ

 

कृती

मारवाड स्टाईलची लसूण चटणी करण्यासाठी सगळ्यात आधी लसूण थोडासा भाजून घ्यावा लागतो. त्यासाठी लसूणाच्याा पाकळ्या टरफलासहीत गरम कढईमध्ये घाला आणि मंद आचेवर त्या भाजून घ्या. त्यानंतर भाजलेला लसूण कढईतून बाहेर काढून घ्या.

केसांची वाढ होण्यासाठी आवळ्याचा खास उपाय! गुडघ्यापर्यंत लांब होतील केस, त्वचाही हाेईल सुंदर

यानंतर लाल मिरच्याही कढईमध्ये घाला आणि त्या ही थोड्याशा भाजून घ्या. नंतर जिरे भाजून घ्या.

भाजलेल्या लाल मिरच्या, लसूण, जिरे हे सगळे पदार्थ थंड झाल्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला. त्यात चवीनुसार मीठ, तेल, आमचूर पावडर आणि जिरे घाला. त्यानंतर मिक्सर फिरवून बारीक चटणी करून घ्या. ही चटणी एअर टाईट डब्यामध्ये ठेवल्यास १० ते १५ दिवस चांगली टिकते. या चटणीला तुम्ही वरून फोडणी देऊनही खाऊ शकता. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Marwari Garlic Chutney: Quick, easy recipe for a flavorful condiment.

Web Summary : Spice up meals with Marwari-style garlic chutney! This easy recipe, ready in minutes, combines garlic, red chilies, cumin, and amchur powder for a delicious side. Grind into a fine paste and store in an airtight container for up to 15 days. Enjoy with dal baati or bhakri.
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स