Join us

लोणचं घालताय? यंदा करा अस्सल मराठवाडी लोणचं मसाला-खार इतका भारी की वर्षभर मुरेल मस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2025 18:27 IST

Marathwadi Loncha Masala Recipe In Marathi: यावर्षी कैरीचं लोणचं करणार असाल तर त्यासाठी विकतचा मसाला आणण्याऐवजी मराठवाडी पद्धतीने घरीच लोणच्याचा मसाला तयार करा.. लोणचं खूप चवदार होईल.(how to make pickle masala or achar masala at home?)

ठळक मुद्देहळूहळू लोणचं छान मुरेल आणि त्याला भरपूर खार सुटेल. 

यंदा पावसाळा लवकर सुरू झाल्याने लोणचं घालण्याची लगबगही तशी लवकरच सुरू झाली आहे. कारण एरवी पहिला पाऊस पडला की लोणचं घातलं जातं. कारण त्यावेळी वातावरणात जो बदल होतो, तो लोणच्याला मानवतो आणि लोणचं खराब न होता वर्षभर चांगलं टिकतं. आता मात्र मे महिन्यातच वातावरण थंड होऊन लोणच्यासाठी अनुकूल झालं आहे. त्यामुळे अनेक जणींची लोणचं घालण्याची गडबडही सुरू झाली आहे. आता तुम्हालाही लोणचं घालायचं असेल तर यावेळी विकतचा मसाला न आणता घरीच अस्सल मराठवाडी पद्धतीने लोणचं मसाला तयार करून पाहा (Marathwadi Loncha Masala Recipe In Marathi).. नेहमीपेक्षा लोणचं जास्त चवदार, चटपटीत होईल.(how to make pickle masala or achar masala at home?) 

 

साहित्य

५० ग्रॅम मोहरीची डाळ

मेथी दाणे, बडिशेप प्रत्येकी १० ग्रॅम

लाल तिखट आणि काश्मिरी लाल तिखट प्रत्येकी २५ ग्रॅम

महिलांनो सावधान! मासिक पाळीबाबत 'या' खोट्या माहितीवर विश्वास ठेवाल तर पस्तावाल.. 

१ टेबलस्पून हळद

२ टिस्पून हिंग

पाव कप तेल

लवंग आणि मिरे प्रत्येकी २ टीस्पून

चवीनुसार मीठ

 

कृती

सगळ्यात आधी तर गॅसवर कढई गरम  करायला ठेवा. कढई व्यवस्थित गरम झाल्यानंतर तिच्यामध्ये मोहरीची डाळ, मेथ्या, बडिशेप, लवंग, मीरे एकेक करून भाजून घ्या.

काही केल्या वजन कमी होईना? रात्री झोपण्यापुर्वी 'हा' चहा प्या, सुटलेलं पोटही कमी होईल

भाजून घेतलेले सगळे मसाले थंड होऊ द्या आणि त्यानंतर मिक्सरमधून वाटून अगदी बारीक पावडर करून घ्या. 

या मसाल्यात थोडं तेल, मीठ, लाल तिखट, काश्मिरी लाल तिखट असं सगळं घाला आणि त्यात कैरीच्या फोडी चांगल्या घोळून घ्या.

 

गरज वाटल्यास वरून आणखी थोडं तेल कोमट करून घाला. सगळं एकदा व्यवस्थित हलवून घेतलं की कैरीचं चटपटीत लोणचं तयार.

पावसाळ्यात साप निघण्याचं प्रमाण वाढतं! खबरदारी म्हणून ५ गोष्टी करा, सापांपासून बचाव होईल

हे लोणचं काचेच्या बरणीत भरून ठेवा आणि त्यावरून थोडं तेल आणि लोणच्याचा मसाला घाला. रोज लोणच्याची बरणी नियमितपणे हलवायला विसरू नका. हळूहळू लोणचं छान मुरेल आणि त्याला भरपूर खार सुटेल.  

टॅग्स :अन्नपाककृतीआंबासमर स्पेशलमोसमी पाऊसपाऊस