दिवाळी सरली आणि आता बऱ्यापैकी सगळ्यांचे रुटीन सुरू झाले आहे. दिवाळीत भरपूर गोडधोड, फराळ खाऊन झाला आणि आता ते सगळे पदार्थ जवळपास संपत आलेले आहेत. मागचे ८ ते १० दिवस तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर चवीमध्ये थोडा बदल म्हणून खमंग उकड शेंगोळ्यांचा बेत करून पाहा. हा पदार्थ मराठवाड्याचा एक पारंपरिक पदार्थ असून तो बच्चेकंपनीपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांनाच आवडू शकतो (how to make ukad shengole?). रेसिपी अगदी सोपी असून रात्रीच्या जेवणासाठी हा मेन्यू एकदा ट्राय करून पाहा..(simple and traditional recipe of ukad shengole)
साहित्य
१ कप ज्वारीचे पीठ
१ कप बेसन
२ कप गव्हाचे पीठ
पांढऱ्या रंगाचे इअर बड्स काळे कळकट्ट दिसतात, पाहा २ उपाय- नव्यासारखे स्वच्छ दिसतील
१ टेबलस्पून हिरव्या मिरच्या, आलं आणि लसणाची पेस्ट
चवीनुसार मीठ
अर्धा कप शेंगदाण्याचा कूट
फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद
अर्ध्या लिंबाचा रस
कृती
एका मोठ्या भांड्यात ज्वारीचे पीठ, बेसन आणि कणिक एकत्र करून घ्या. त्यामध्ये मीठ, ओवा, तिखट, जिरेपूड, धनेपूड घालून पीठ घट्ट मळून घ्या. त्यावर १५ ते २० मिनिटे झाकण ठेवून द्या.
महागडे शाम्पू लावूनही केस गळणं थांबेना? 'हा' घरगुती शाम्पू लावा, महिनाभरात फरक दिसेल..
यानंतर हाताला तेल लावून पिठाचे छोटे छोटे शेंगोळे तयार करा. गॅसवर कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये तेल, मोहरी, हिंग घालून फोडणी करून घ्या. त्यात आलं, लसूण, मिरचीची पेस्ट, कोथिंबीर घालून परतून घ्या. यानंतर दाण्याचा कूट आणि गरम पाणी घाला.
कढईतल्या पाण्याला उकळी आली की त्यात मीठ घाला आणि तयार केलेले शेंगोळे एकेक करून सोडा. शेंगोळे कढईतल्या पाण्यात सोडत असताना वारंवार ते पाणी हलवून घ्या. नाहीतर त्याचा गचका होतो. नंतर कढईवर झाकण ठेवून वाफ येऊ द्या. गरमागरम उकड शेंगोळे झाले तयार.
