Mango Leaves Benefits : आंब्याचा सीझन आला आहे. आंब्याची रस, पन्ह, लोणचं यावर ताव मारण्यासाठी लोक तयार झाले आहेत. सगळ्यांनाच माहीत आहे की, आंब्याला फळांचा राजा म्हटलं जातं. उन्हाळ्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आंबट-गोड आंब्यांवर वेगवेगळ्या पद्धतीनं ताव मारतात. आंब्याची चव तर सगळ्यांना मोहिनी घालणारी आहेच, सोबतच यात आरोग्यासाठी आवश्यक अनेक पोषक तत्व असतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, केवळ आंबेच नाहीत तर आंब्याची पानंही आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. आंब्यांच्या पानांचा धार्मिक महत्व आहेच. मात्र, यात असे काही पोषक तत्व असतात जे अनेक उपचारांमध्ये रामबाण उपाय ठरतात.
आंब्याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, सी आणि बी भरपूर प्रमाणात असतात. सोबतच यात अॅंटी-ऑक्सिडेंट आणि इतरही अनेक औषधी गुण असतात. जे अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात. त्यामुळे तुम्हाला आंब्याच्या पानांचे फायदे कसे कसे आणि कोणत्या समस्यांवर होतात हे माहीत असलं पाहिजे. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
डायबिटीसच्या रूग्णांसाठी रामबाण
आंबे खाल्ले तर डायबिटीसच्या रूग्णांची शुगर लेव्हल वाढू शकते. अशात त्यांना आंबे न खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, आंब्याची पानं डायबिटीसच्या रूग्णांसाठी खूप फायदेशीर ठरतात. आंब्याच्या पानांमध्ये एंथोसायनिडीन नावाचं टॅनिन असतं, जे ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत करतं. यासाठी आंब्याची पानं वाळवून त्यांचं पावडर तयार करा आणि रोज त्याचा वापर करा.
केसांची वाढ
वेगवेगळ्या वनस्पतींसह आंब्याची पानं केसांची वाढ होण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. आंब्याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडेंट असतात, जे केसांची वाढ करण्यास मदत करतात. तसेच केसगळतीची समस्याही दूर करतात. यासाठी आंब्याची पानं उकडून घ्या, नंतर हे पाणी थंड झाल्यावर त्यानं केसांची मसाज करा. काही दिवस उपाय केल्यावर तुम्हाला फायदा दिसून येईल.
पोटासाठी फायदेशीर
पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या नेहमीच होत असतात. या समस्या दूर करण्यासाठी आंब्याची पानं फायदेशीर ठरतात. यासाठी आंब्याची पानं गरम पाण्याच रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी पाणी गाळून उपाशीपोटी प्या. हे पाणी नियमितपणे प्यायल्यास पोट निरोगी राहतं. तसेच या पाण्यानं शरीरात जमा झालेले विषारी तत्वही बाहेर पडतात. बद्धकोष्ठता, पोटदुखी, गॅस अशा समस्याही दूर होतात.
वजन कमी करतात
जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर तुम्ही नियमितपणे आंब्याच्या पानांचा चहा पिऊ शकता. आंब्याची पानं हे नॅचरल मेटाबॉलिज्म बूस्टर मानले जातात. ज्यामुळे पचनक्रिया मजबूत होते आणि यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते.