Lokmat Sakhi >Food > मलायका अरोराला आवडतो झणझणीत पनीर ठेचा! पाहा या चमचमीत पदार्थाची खमंग रेसिपी

मलायका अरोराला आवडतो झणझणीत पनीर ठेचा! पाहा या चमचमीत पदार्थाची खमंग रेसिपी

Food And Recipe: मलायका अरोराने तिच्या घरी होणारी पनीर ठेचा ही एक मस्त रेसिपी सांगितली आहे..(Malaika Arora's favourite paneer thecha)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2024 17:31 IST2024-12-18T15:59:41+5:302024-12-18T17:31:09+5:30

Food And Recipe: मलायका अरोराने तिच्या घरी होणारी पनीर ठेचा ही एक मस्त रेसिपी सांगितली आहे..(Malaika Arora's favourite paneer thecha)

Malaika Arora's favourite paneer thecha, how to make paneer thecha? | मलायका अरोराला आवडतो झणझणीत पनीर ठेचा! पाहा या चमचमीत पदार्थाची खमंग रेसिपी

मलायका अरोराला आवडतो झणझणीत पनीर ठेचा! पाहा या चमचमीत पदार्थाची खमंग रेसिपी

Highlightsपनीर आणि ठेचा या दोन पदार्थांचं कॉम्बिनेशन खरंच खूप अफलातून असून मलायका अरोरा सांगते की हा पदार्थ तिच्या घरात नेहमीच होतो..

पनीरमधून भरपूर प्रमाणात प्रोटीन्स मिळतात. त्यामुळे ते आपल्या आहारात असणं गरजेचं आहे. पनीरची भाजी, पनीर भुर्जी, पनीर पराठे असं आपण नेहमीच खातो. कधी  गेल्यावर पनीर चिली, रोस्टेड पनीर असे अनेक पदार्थही खाण्यात येतात. आता तुम्हाला जर या सगळ्यांपेक्षा एकदम वेगळा असा पनीरचा एखादा पदार्थ खायचा असेल तर मलायका अरोराने सांगितलेली ही पनीर ठेचा रेसिपी एकदा ट्राय करून पाहा (how to make paneer thecha?). पनीर आणि ठेचा या दोन पदार्थांचं कॉम्बिनेशन खरंच खूप अफलातून असून मलायका अरोरा सांगते की हा पदार्थ तिच्या घरात नेहमीच होतो..(Malaika Arora's favourite paneer thecha)

 

पनीर ठेचा करण्याची रेसिपी

पनीर ठेचा हा नेमका कोणता पदार्थ आहे आणि तो कसा करायचा याविषयी मलायका अरोराने सांगितलेली रेसिपी eatwithaishwarya या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. 

साहित्य

२०० ते २५० ग्रॅम पनीर

५ ते ६ हिरव्या मिरच्या

केस गळणे थांबविणारे सुपरफूड! अगदी आजपासूनच खायला सुरुवात करा, महिनाभरात फरक दिसेल

८ ते १० लसूण पाकळ्या

१ टीस्पून जिरे

१ टेबलस्पून शेंगदाणे

शिल्पा शेट्टी म्हणते- तुपापासून दूर पळू नका, माझ्यासारखं दिसायचं तर रोज 'एवढं' तूप नक्की खा...

२ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर

चवीनुसार मीठ

१ टेबलस्पून तूप

 

कृती

सगळ्यात आधी कढई गॅसवर गरम करायला ठेवा आणि त्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण, शेंगदाणे टाकून थोडं भाजून घ्या.

त्यानंतर भाजून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, लसूण, शेंगदाणे, कोथिंबीर, जिरे असं सगळं खलबत्त्यात टाकून कुटून घ्या किंवा मग मिक्सरमध्ये टाकून वाटून घ्या.. त्यात चवीनुसार मीठ घाला.

हातावर मोकळा सोडलेला पदर सांभाळताना नाकीनऊ येतात? पदर पिनअप करण्याची सोपी ट्रिक बघाच

त्यानंतर पनीरचे चौकोनी काप करा आणि प्रत्येक कापाला थोडा थोडा ठेचा सगळीकडून लावा.

त्यानंतर तवा गरम करायला ठेवा. त्यावर तेल टाका आणि मग ठेचा लावलेले पनीर टाकून शॅलाेफ्राय करा.. शॅलोफ्राय केलेले हे पनीर कच्चा कांदा टाकून खायला छान लागतात. टोमॅटो सॉससोबत किंवा मग लिंबू पिळून तुम्ही ते खाऊ शकता.. 


 

Web Title: Malaika Arora's favourite paneer thecha, how to make paneer thecha?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.