जेवणात काय वेगळं करावं हा प्रश्न नेहमीच पडतो. सकाळी तर भाजी, पोळी, वरण, भात असा चारीठाव स्वयंपाक केला जातो. पण रात्री मात्र काहीतरी वेगळं खावं वाटतं. अशावेळी करण्यासाठी मखमली रोटी हा एक मस्त पर्याय आहे. तसेच मुलांच्या डब्यासाठीही तो उत्तम आहे. मखमली पराठा म्हणजे खूप काही वेगळं नसून आलू पराठा किंवा बटाट्याचा पराठा करण्याची ती थोडी वेगळी पद्धत आहे, असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे ज्यांना आलू पराठे आवडतात त्यांनी ही रोटी एकदा नक्कीच करावी आणि खाऊन पाहावी.(Makhmali Roti Recipe)
मखमली रोटी रेसिपी
साहित्य
२ ते ३ उकडलेले बटाटे
चिली फ्लेक्स, ओरिगॅनो आणि चाट मसाला
गुढीपाडवा स्पेशल: श्रीखंडपुरीसोबत हवीच बटाट्याची खमंग भाजी, पाहा बटाट्याच्या भाजीची परफेक्ट रेसिपी
आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट
१ कप तांदळाचं पीठ आणि १ कप कणिक
चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली काेथिंबीर
कृती
मखमली रोटी करण्यासाठी सगळ्यात आधी बटाटे उकडून घ्या आणि ते किसून घ्या.
आता किसलेल्या बटाट्यामध्ये आलं, लसूण, मिरचीची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, चाट मसाला, ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स घाला.
आता या मिश्रणात जेवढं बसेल तेवढंच त्यात तांदळाचं पीठ आणि कणिक घाला. वरतून पाणी न घालता बटाट्याच्या ओलसरपणातच पीठ भिजवून घ्या. भिजवून घेतलेल्या पिठाला तेलाचा हात लावा आणि ते १० मिनिटे झाकून ठेवा.
यानंतर त्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून त्याचे पराठे लाटा. तव्यावर भाजा आणि त्यांना तूप किंवा बटर लावा.. खूप मस्त चवीचे गरमागरम मखमली पराठे तयार. ही रेसिपी stylishachari या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
Web Summary : Looking for a new dish? Try Makhmali Roti, a simple twist on aloo paratha, perfect for lunchboxes or dinner. Made with mashed potatoes, spices, rice flour and wheat flour, it's a flavorful and satisfying meal. Enjoy it with butter or ghee!
Web Summary : एक नई डिश खोज रहे हैं? मखमली रोटी ट्राई करें, यह आलू पराठा का एक सरल रूप है, जो लंचबॉक्स या रात के खाने के लिए एकदम सही है। मैश किए हुए आलू, मसाले, चावल का आटा और गेहूं के आटे से बना, यह एक स्वादिष्ट और संतोषजनक भोजन है। इसे मक्खन या घी के साथ आनंद लें!