भारतामध्ये केल्या जाणाऱ्या पारंपारिक रेसिपी अगदी चविष्ट तर असतातच त्याबरोबर पौष्टिकही असतात. (Make wheat flour pejj in just 10 minutes! A nutritious summer dish for kids)अगदी कमी वेळात तसेच कमी सामग्री वापरून छान पदार्थ करता येतात. लहानपणी आजारी पडल्यावर आई एक पेज करुन द्यायची. ताप असो वा खोकला तोंडाची चव गेल्यावर ही पेज आपण प्यायचो. अगदी पोटभर खाल्ली तरी उलटून पडायची नाही. तसेच पोटाला आधार मिळायचा आणि औषधेही पटकन पचायची. (Make wheat flour pejj in just 10 minutes! A nutritious summer dish for kids)पण अशी पेज फक्त आजारपणातच खातात असे नाही. लहान मुलांसाठी तर हा एक अत्यंत पौष्टिक पदार्थ आहे. ही पेज गव्हाच्या पीठाची करतात. काही जण त्यामध्ये गुळही घालतात. तरी काही फक्त साधी तुपाची फोडणी देतात.
साहित्यगव्हाचे पीठ, तूप, जिरे, मीठ, पाणी
कृती१. एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप घ्या. त्यामध्ये मस्त भरपूर जिरे घाला. जिरे छान खमंग परतून घ्या. पेजेला जिऱ्याचा वास छान येतो. बाकी मसाले या पदार्थामध्ये काहीच नाहीत. त्यामुळे जिरे फार खमंग ठरते. जिरे तडतडले की त्यामध्ये पीठ घाला. गव्हाचे पीठ छान परतून घ्या. तुपाचा खमंग वास सुटेल. पीठाचा रंग जरा गडद होईल. पीठ छान परतल्यावर त्यामध्ये पाणी घाला. वाटीभर पीठ असेल तर मग वाटीभर पाणी घ्यायचे.
२. सतत मिश्रण ढवळत राहा. जरा घट्ट झाले की त्यामध्ये मीठ घाला. पाच मिनिटे मिश्रण ढवळा मग गॅस बंद करा. खोलगट भांड्यामध्ये पेज ओता. नंतर वरतून छान तुपाची धार सोडा.