Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > गरमागरम सुगंधी आणि चवीला भारी असा वांगी भात खाणार का? करायला अगदीच सोपा

गरमागरम सुगंधी आणि चवीला भारी असा वांगी भात खाणार का? करायला अगदीच सोपा

Make Vangi Bhat for lunch or dinner you will love it for sure, must try recipe : वांगी भात नक्कीच खा. चवीला एकदम भारी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2026 19:18 IST2026-03-17T19:17:52+5:302026-03-17T19:18:50+5:30

Make Vangi Bhat for lunch or dinner you will love it for sure, must try recipe : वांगी भात नक्कीच खा. चवीला एकदम भारी.

Make Vangi Bhat for lunch or dinner you will love it for sure, must try recipe | गरमागरम सुगंधी आणि चवीला भारी असा वांगी भात खाणार का? करायला अगदीच सोपा

गरमागरम सुगंधी आणि चवीला भारी असा वांगी भात खाणार का? करायला अगदीच सोपा

भाताचे विविध प्रकार आपण खातोच. भात पोटभरीचा असतो आणि खाताना समाधानही मिळते. त्यामुळे आहारात भात नक्की असावा. (Make Vangi Bhat for lunch or dinner you will love it for sure, must try recipe )भाताच्या अनेक प्रकारांपैकी एक म्हणजे वांगी भात. हा एक पारंपरिक पदार्थ आहे. करायला सोपा आहे त्यामुळे नक्कीच करुन पाहा. पटकन होतो आणि झणझणीत लागतो. पाहा सोपी रेसिपी.   

साहित्य 
तांदूळ, वांगी, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कडीपत्ता, मोहरी, जिरे, हळद, लाल तिखट, गोडा मसाला, तेल, शेंगदाणे, गरम मसाला, कोथिंबीर, पाणी 

कृती
१. तांदूळ स्वच्छ धुऊन १५ते २० मिनिटे भिजत ठेवा. यामुळे भात मोकळा आणि छान शिजतो. तोपर्यंत वांगी धुऊन मध्यम आकाराचे तुकडे करुन पाण्यात ठेवा, त्यामुळे ती काळी पडत नाहीत.

२. आता कढई किंवा कुकरमध्ये तेल गरम करायचे. तेल चांगलं तापलं की त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली की जिरे, कडीपत्ता आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालून फोडणी तयार करा छान परतून घ्या. त्यानंतर शेंगदाणे घालून छान परतून घ्यायचे, त्यामुळे भाताला छान टेक्स्चर येते.

३. नंतर बारीक चिरलेला कांदा घालून तो सोनेरी रंग येईपर्यंत परतावा. कांदा चांगला परतला की भाताला गोडसर आणि छान फ्लेवर येतो. आता टोमॅटो घालून तो पूर्ण मऊ होईपर्यंत शिजवा. टोमॅटो शिजल्यानंतर त्यात चिरलेली वांगी घाला आणि ३ते ४ मिनिटे मध्यम आचेवर परतून घ्या. त्यात हळद घाला तसेच लाल तिखट, गोडा मसाला आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण एकजीव करायचे. आता भिजवलेले तांदूळ पाणी काढून त्यात घाला आणि हलक्या हाताने १ ते २ मिनिटे परता. 

४. कुकर वापरत असाल तर मध्यम आचेवर २-३ शिट्ट्या होऊ द्या. कढईत करत असाल तर झाकण ठेवून मंद आचेवर भात पूर्ण शिजू द्या. मधे एकदा हलक्या हाताने ढवळून घ्या, भात शिजल्यानंतर ५ मिनिटे तसेच झाकून ठेवा, मग वरून कोथिंबीर घालून हलक्या हाताने मिक्स करा.
 

Web Title : गरमागरम वांगी भात: झटपट, आसान और स्वादिष्ट रेसिपी!

Web Summary : वांगी भात, एक पारंपरिक और स्वादिष्ट चावल का व्यंजन, बनाना आसान है। सब्जियां भूनें, मसाले, चावल डालें और पकने तक पकाएं। धनिया से गार्निश करें और संतोषजनक भोजन का आनंद लें।

Web Title : Spicy and fragrant Vangi Bhat recipe: Quick, easy, and delicious!

Web Summary : Vangi Bhat, a traditional and flavorful rice dish, is easy to prepare. Sauté vegetables, add spices, rice, and cook until done. Garnish with coriander and enjoy a satisfying meal.