Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुलगुले नहीं खाया तो क्या खाया! ५ मिनिटांत करा पारंपरिक गुलगुले झटपट, महागातल्या महाग मिठाईपेक्षा भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2026 14:57 IST

Make traditional recipe in 5 minutes, very tasty and easy sweet recipe : मस्त चविष्ट गुलगुले करा काही मिनिटांत .

महाराष्ट्रात तसेच उत्तर भारतातील काही भागातही गुलगुले हा पदार्थ लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे हा पदार्थ बाजारातील मिठाईपेक्षा अधिक पौष्टिक मानला जातो, कारण तो गव्हाच्या पिठापासून आणि गुळापासून तयार केला जातो. गुळामध्ये लोह आणि खनिजे असतात, त्यामुळे हा गोड पदार्थ थोड्या प्रमाणात खाल्ल्यास ऊर्जा मिळते.(Make traditional recipe in 5 minutes, very tasty and easy sweet recipe )लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे गव्हाचे गुलगुले हे आपल्या पारंपरिक पाककृतीतील साधेपणा आणि गोडवा जपणारे उदाहरण आहे. अगदी मोजक्या पदार्थांतही चविष्ट गोड पदार्थ करता येतात याचे उत्तम उदाहरण.  

साहित्य गव्हाचे पीठ, गूळ, तेल, पाणी, जिरे, बेकींग सोडा, वेलची पूड, बडीशेप, मीठ 

कृती१. एका खोलगट पातेल्यात गव्हाचे पीठ घ्यायचे. त्यात जिरे घालायचे. अगदीच चिमुटभर मीठ घालायचे. तसेच बडीशेपही घालायची आणि थोडी वेलची पूड घालायची. मिक्स करायचे.

२. गूळ चिरुन घ्यायचा. किसून घ्यायची तशी गरज नाही, किसलेला असेल तर उत्तम. बारीक चिरायचा. एका पातेल्यात गूळ घ्यायचा. त्यात पाणी ओतायचे. गूळ पूर्ण विरघळेपर्यंत उकळवायचे. पाणी उकळून त्याचा रंग काळसर होतो. तो पर्यंत गूळ छान उकळायचा. उकळून झाल्यावर गार करायचा. 

२. गव्हाच्या पीठात गुळाचे पाणी गाळून ओतायचे. पीठ मस्त मिक्स करायचे. एक वाटी पिठासाठी दोन वाटी गूळ पाणी लागते. पीठ घट्ट नाही तर मऊ करायचे. जसे भजीसाठी करता अगदी तसंच. तेल गरम करायचे. आणि त्यात हाताने तयार मिश्रणाचे लहान गोळे सोडायचे. खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळायचे. रंग गडद झाला की काढून घ्यायचे. गार करायचे. आत मऊ आणि बाहेरुन मस्त कुरकुरीत असतात. 

English
हिंदी सारांश
Web Title : Easy Gulgule Recipe: A Traditional Sweet Better Than Store-Bought!

Web Summary : Gulgule, a nutritious treat made with wheat flour and jaggery, is popular in Maharashtra and North India. This easy recipe uses simple ingredients like wheat flour, jaggery, spices, and baking soda. Fry small portions until golden brown for a delicious, crispy, and soft sweet.
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स