अगदी साधा मात्र समाधानकारक असा खाण्याचा प्रकार म्हणजे कढी. कढीची खासियत म्हणजे ती हलकी असूनही पोटभरीची असते. गरम भातावर ओतलेली कढी किंवा साध्या पोळी-भाकरीसोबत घेतलेली कढी मनाला आणि पोटाला दोन्हीला शांतता देते. आजारी असताना, थकवा आलेला असताना किंवा हलकं-साधं खायचं असेल तेव्हा कढी हमखास आठवते. (Make this spicy kadhi with khichdi, a different recipe than usual, must try - easy to make )घराघरांत कढीची चव थोडी फार बदलत असली तरी तिच्याबद्दलचं प्रेम मात्र सगळीकडे सारखंच असतं. कुणाच्या हातची कढी आंबटसर, कुणाची थोडी गोडसर तर कुणाची मसालेदार. पण प्रत्येक कढीत आपुलकीची ऊब असते. आईच्या हातची कढी असो किंवा आजीने केलेली, तिची चव कायम लक्षात राहणारी असते. साधी कढी खुपच सुंदर असली तरी एकदा अशी मसाला कढी नक्की करुन पाहा.
साहित्य दही, लाल तिखट, हळद, काळीमिरी, आलं, लसूण, कोथिंबीर, कांदा, जिरे, मोहरी, हिंग, पाणी, तूप, कडीपत्ता, मीठ, कसुरी मेथी, हिरवी मिरची, काश्मीरी लाल मिरची
कृती१. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. नंतर मस्त ठेचून घ्यायच्या. तसेच आल्याचा लहान तुकडा किसून घ्यायचा. एका खोलगट पातेल्यात दही घ्यायचे. त्यात थोडे मीठ आणि थोडे लाल तिखट घ्यायचे. त्यात पाणी घालून मस्त घट्ट असे ताक घुसळायचे. कोथिंबीर बारीक चिरायची. कांदा सोलायचा आणि मस्त बारीक चिरायचा. तसेच काश्मीरी लाल मिरचीचे तुकडे करुन घ्यायचे. हिरव्या मिरचीचेही बारीक तुकडे करायचे.
२. एका कढईत थोडे तूप घ्यायचे. तूप जरा कोमट झाले की त्यात मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की त्यात थोडे जिरे घालायचे. जिरे छान फुलले की त्यात कडीपत्ता घालायचा. थोडं हिंग घालायचे. ठेचलेली काळीमिरी घालायची. तसेच काश्मीरी लाल मिरची आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आणि किसलेलं आलं घालून छान परतायचे. ठेचलेला लसूण घालायचा. बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि परतून घ्यायचा.
३. कांदा लालसर परतला की त्यात हळद आणि लाल तिखट घालायचे. मग तयार केलेले ताक घालायचे आणि एक उकळी काढायची. उकळी काढल्यावर हातावर मळून कसुरी मेथी घालायची. नंतर त्यात चवीपुरते मीठ घालायचे. कढी मस्त उकळायची. घट्टपणा संतुलित करण्यासाठी गरजेनुसार पाणी घालायचे.
Web Summary : Kadhi is a satisfying, light, and comforting dish. This recipe details making a flavorful, spicy kadhi with ginger, garlic, and Kashmiri chili. It's perfect with khichdi or roti.
Web Summary : कढ़ी एक संतोषजनक, हल्का और आरामदायक व्यंजन है। इस रेसिपी में अदरक, लहसुन और कश्मीरी मिर्च के साथ स्वादिष्ट, मसालेदार कढ़ी बनाने का विवरण दिया गया है। यह खिचड़ी या रोटी के साथ एकदम सही है।