पावसाळा सुरु झाल्यावर वातावरण अगदी छान वाटते. सगळीकडे हिरवळ पसरते. मे महिन्यात उकडून वैतागलेल्या जीवाला मस्त थंड वाटायला लागते. विविध पदार्थ खायला मिळतात. चहा प्यायची मज्जा दुप्पट होते. सगळे काही छान चालू असते आणि अचानक शिंका सुरू होतात. (make this special tasty drink and drink it during rain, you won't be bothered by monsoon diseases)अंग जरा गरम वाटायला लागते. खोकला सुरू होतो नाक वाहायला लागते. मग अंगात ताप भरल्यावर मस्त गार वाटणारे वातावरण नकोसे वाटायला लागते. पावसाळी वातावरण जितके मोहक तितकेच बाधक. त्यामुळे जरा काळजी घ्यायलाच हवी. काही सोपे उपाय पावसाळा आला की लगेच सुरु करायचे म्हणजे मग वातावरण बदल्यावर अंगावर येत नाही. आजारपण जवळ फिरकतही नाही.
पावसाळ्यात चहा तर हवाच मात्र एखादं वेळ काढाही प्यायचा. सर्दी, खोकला, ताप कसली चिंता नाही. काढा म्हटल्यावर तोंड लगेच वाकडे होते. मात्र काढा कडूच असतो किंवा चवीला वाईटच असचो असे काही नाही. चवीला मस्त आणि पुन्हा प्यावासा वाटेल असाही काढा करता येतो. ही सोपी रेसिपी पाहा.
साहित्यतुळस, आलं, हळद, सुंठ, काळी मिरी, लवंग, दालचिनी, गूळ
कृती१. तुळशीची छान ताजी पाने तोडून घ्यायची. आलं मस्त किसून घ्यायचे. (make this special tasty drink and drink it during rain, you won't be bothered by monsoon diseases)सुंठेची पूड असेल तर उत्तमच नसेल तर सुंठ जरा ठेचून घ्यायची. लवंग ठेचून घ्यायची. दालचिनीची पूड असेल तर पूड घ्या. नसेल तर दालचिनीही जरा ठेचा किंवा कुटा. गूळ किसून घ्यायचा. गूळ नको असेल तर मधही घेऊ शकता. साखर घेणे मात्र टाळा.
२. गॅसवर पाणी तापत ठेवा. जर एक कप काढा करायचा असेल तर तीन कप पाणी घ्यायचे. पाण्यात सुंठ घालायची. तुळशीची पाने घालायची. तसेच किसलेले आले घाला आणि काळी मिरी घाला. इतरही सगळे पदार्थ घालायचे आणि काढा उकळायचा. उकळून अर्धा झाल्यावर त्यात गूळ घाला. गूळ विरघळू द्या. काढा गाळून घ्यायचा. मध घालणार असाल तर गाळल्यानंतर घालायचे. उकळताना घालू नका.