सोयाबीन अनेकांना बेचव वाटते. मात्र सोयाबीन फार पौष्टिक आणि पटकन तयार होणारा पदार्थ आहे. योग्य पद्धतीने केला तर तो ही चविष्ट नक्की लागेल. (Make this soybean fried rice once, it's rich in protein and the kids will love it )सोयाबीनच्या अनेक रेसिपी आहेत. त्यापैकी एक म्हणजे सोयाबीन राईस. हा फ्राईड राईसचा प्रकार अगदी चविष्ट आणि करायला सोपा असा आहे. त्यामुळे नक्की करुन पाहा.
साहित्य सोयाबीन, आलं, लसूण, लाल तिखट, तांदूळ, गाजर, कांदा, सिमला मिरची, कोबी, मीठ, कांद्याची पात, काळीमिरी पूड, तेल, रेड चिली सॉस, सोया सॉस
कृती१. एका पातेल्यात पाणी घ्यायचे. त्यात मीठ घालायचे आणि त्यात सोयाबीन घालून उकळायचे. जास्त नाही त्याचा लगदा नका करु फक्त उकळून मऊ करायचे. नंतर पाणी काढून टाकायचे. जरा सुके झाल्यावर त्यात आलं - लसूण पेस्ट करुन घालायची. दोन चमचे लाल तिखट घालायचे. मिक्स करायचे आणि मग थोडावेळ मॅरिनेट करत ठेवायचे.
२. सिमला मिरची लांब - लाबं चिरुन घ्यायची. कोबीही लांब पातळ चिरायचा. कांदा सोलून लांब पातळ चिरायचा. कांद्याची पात बारीक गोलाकार चिरायची. गाजर सोलायचे आणि नंतर त्याचे लांब पातळ तुकडे करायचे. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्या आणि मग बारीक चिरुन घ्या.
३. भात शिजवून घ्यायचा. साधा वापरा किंवा बासमती वापरा कोणताही भात चालतो. एका कढईत थोडे तेल घ्यायचे. त्यात बारीक चिरलेला लसूण घालायचा आणि परतून घ्यायचा. त्यात कांदा घालायचा, गाजर घालायचे, परतायचे. नंतर त्यात सिमला मिरची घाला, कांद्याची पात घाला आणी कोबी घाला. झाकण ठेवा एक वाफ काढून सगळ्या भाज्या शिजवून घ्यायच्या.
४. एका पॅनमध्ये थोडे तेल घ्या त्यावर मॅरिनेट केलेले सोयाबीन परतून घ्या. खमंग कुरकुरीत परतायचे. नंतर सोयाबीन भाज्यांमध्ये मिक्स करा आणि त्यात थोडा सोया सॉस आणि थोडा रेड चिली सॉस घालायचा. थोडी मिरी पूड घाला आणि मस्त मिक्स करा. त्यात शिजवलेला मोकळा भात घाला आणि छान मिक्स करा. जरा एक वाफ काढा. चवीनुसार मीठ घाला आणि भात - भाज्या एकत्र शिजवा. गरमागरम खा.
Web Summary : Make tasty, protein-packed soybean fried rice easily. Marinate soybean, sauté vegetables like carrots, cabbage, and capsicum. Mix with sauces, spices, and cooked rice. A healthy and delicious meal ready!
Web Summary : स्वादिष्ट, प्रोटीन से भरपूर सोयाबीन फ्राइड राइस आसानी से बनाएं। सोयाबीन को मैरीनेट करें, गाजर, पत्ता गोभी और शिमला मिर्च जैसी सब्जियां भूनें। सॉस, मसाले और पके हुए चावल के साथ मिलाएं। एक स्वस्थ और स्वादिष्ट भोजन तैयार!