वन पॉट भात वगैरे तर आपण करतच असतो. जास्त भांडी न वापरता असे झटपट करता येणारे पदार्थ वेळ वाचवतात आणि भांडी घासायचे कष्टही. असाच एक पदार्थ म्हणजे मटार घुगनी. बंगाल, बिहार, ओडिसा, आसाम, नेपाळ आदी ठिकाणी हा पदार्थ केला जातो. थंडीच्या दिवसांत आवर्जून खाल्ला जातो.(Make this one pot recipe in no time, a spicy pea curry you've never tried before) करायला अगदी सोपा आहे. त्यामुळे नक्की करुन पाहा. थंडीत ताजे मटार मिळतात, त्यामुळे ही रेसिपी करण्याची अगदी उत्तम वेळ आहे. डब्यासाठी तसेच पाहुण्यांसाठी करण्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे.
साहित्य
मटार, बटाटा, कांदा, लसूण, टोमॅटो, आलं, तेल, हळद, कोथिंबीर, धणे पूड, हिंग, लाल तिखट, मीठ, गरम मसाला, कांदा-लसूण मसाला, दालचिनी, काळीमिरी, लवंग, पाणी
कृती
१. छान ताजे मटार सोलून घ्यायचे. बटाटा सोलून घ्यायचा. तुकडे करायचे नाही अख्खा बटाटा घ्यायचा. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. टोमॅटो बारीक चिरायचा. कोथिंबीर निवडायची. ताजी छान कोथिंबीर बारीक चिरायची. आलं किसून घ्यायचे. कांदा लांब - लांब चिरायचा.
२. एका कुकरमध्ये भरपूर मटार दाणे घ्यायचे. त्यात लांब - लांब चिरलेला कांदा घालायचा. तसेच टोमॅटो घालायचा आणि बटाटाही घालायचा. त्यात चार ते पाच लवंग घाला. नंतर त्यात थोडी दालचिनी घालायची. तसेच दोन - चार काळीमिरी ठेचून घालायच्या.
३. त्यात चमचाभर कांदा - लसूण मसाला घालायचा. तसेच थोडी हळद घालायची. तसेच धणे पूडही घालायची. लाल तिखट घालायचे. गरम मसालाही घालायचा. थोडी हळद घालायची. चमचाभर हिंग घालायचे. किसलेले आले घाला आणि शेवटी गरजेनुसार मीठ घाला. त्यात थोडे तेल घाला आणि ढवळून घ्या. मसाला आणि तेल सगळीकडे पसरेल याची काळजी घ्या. नंतर त्यात थोडे पाणी घालायचे आणि कुकर लावायचा. दोन ते चार शिटी काढा. जास्त शिटी काढली तर मसाले आणि भाज्या छान शिजतात. कुकर उघडल्यावर गरमागरम भातासोबत खा.
