थंडीच्या दिवसात आहारात सूप असावे. हा पदार्थ पौष्टिकही असते तसेच चव मस्त असते. गरम प्यायची इच्छा थंडीत होतेच. त्यामुळे गरमागरम सूप प्यायचे. विविध प्रकारचे सूप असतात. (Make this hot and delicious soup at home in 10 minutes, drink this Chinese soup the taste is better than the hotel)त्यापैकी एक म्हणजे मनचाव सूप बरेच जण याला मंच्यूरियन सूपही म्हणतात. हे सूप विकत आवडीने खाल्ले जाते. मात्र घरी करणेही सोपेच आहे. शिवाय घरी केलेले पौष्टिक असते. अजिनोमोटो , व्हिनेगर काहीही घालायची गरज नाही. पाहा कसे करायचे.
साहित्य
कोबी, कांदा, सिमला मिरची, गाजर, हिरवी मिरची, तेल, आलं, लसूण, चिली सॉस, सोया सॉस, पाणी, मीठ, कॉर्नफ्लावर
कृती
१. कोबी बारीक चिरायचा. कांदा सोलायचा आणि कांदाही बारीक चिरायचा. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. लसुणही बारीक चिरायचा. आलं किसायचे. गाजर सोलायचे आणि बारीक चिरायचे. सिमला मिरचीही बारीक चिरायची. सगळ्या भाज्या छान बारीक चिरायच्या. हिरव्या मिरचीचेही तुकडे करायचे.
२. एका कढईत तेल घ्यायचे. तेल जरा गरम झाल्यावर त्यात लसूण घाला. आलं घाला आणि परतून घ्यायचे. हिरव्या मिरचीचे तुकडेही घाला. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा छान परतून घ्यायचा. गाजर घाला आणि कोबीही घाला. तसेच सिमला मिरची घाला आणि परतून घ्या. चमचाभर चिली सॉस, चमचाभर सोया सॉस घाला. परतून सगळ्या भाज्या छान परतून झाल्यावर त्यात पाणी घालायचे. भाज्या उकळायच्या.
३. त्यात चवी पुरते मीठ घाला. सोया सॉस खारट असतो त्यानुसार मीठाचे प्रमाण ठेवायचे. एका वाटीत चमचाभर कॉर्नफ्लावर घ्यायचे. त्यात पाणी घालायचे. त्याची पेस्ट तयार करायची. त्यात गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यायची. ती पेस्ट ओतायची. ढवळायचे. छान उकळायचे. जरा घट्ट झाले की गरमागरम प्यायचे.
