Join us
Daily Top 2Weekly Top 5

काय म्हणता, कोथिंबीरीची भजी कधीच खाल्ली नाही? आजच करा कुरकुरीत खमंग हिरवीगार भजी-चमचमीत रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2026 17:04 IST

Make this crispy, flavorful Coriander pakoda recipe, must try recipe , tasty food : कोथिंबीरीची भजी एकदम सोपी आणि चविष्ट.

चहासोबत काही खायला मिळालं की मजाच काही वेगळी येते. संध्याकाळी किंवा सकाळच्या वेळी तसेच घरी पाहुणे आल्यावर काहीतरी गरमागरम खायला आपण करतोच. त्यापैकीच एक लोकप्रिय पदार्थ म्हणजे भजी. बटाटा भजी असेल किंवा कांदा भजी असेल, गरमागरम खायला मिळाली की मजाच येते. चहा आणि भजी हे जगात भारी असं कॉम्बिनेशन आहे. (Make this crispy, flavorful Coriander pakoda recipe, must try recipe , tasty food)पण फक्त कांदा - बटाटा भजीच नसते इतरही अनेक प्रकार आहेत. त्यापैकीच एक म्हणजे कोथिंबीर भजी. करायला सोपी आणि चवीला भारी. एकदा नक्कीच करुन पाहा.  

साहित्य कोथिंबीर, बेसन, तांदूळ पीठ, लसूण, आलं, हिरवी मिरची, मीठ, तेल, बेकींग सोडा, लाल तिखट, जिरे , पाणी 

कृती१. कोथिंबीरीची छान ताजी जुडी घ्यायची. व्यवस्थित निवडून घ्यायची आणि मग बारीक चिरुन घ्यायची. कोथिंबीर जास्त घ्या म्हणजे त्याची चव लागते. आल्याचा तुकडा घ्यायचा, लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. हिरव्या मिरचीचे तुकडे घ्यायचे. एका मिक्सरच्या भांड्यात आलं, लसूण, हिरवी मिरची घ्यायची आणि त्याची पेस्ट वाटून घ्यायची. 

२. एका पातेल्यात थोडं बेसन घ्यायचं. त्यात थोडं तांदूळाचं पीठ घालायचं. आलं- लसूण - हिरवी मिरची पेस्ट घालायची. थोडं लाल तिखट घालायचं. थोडा बेकींग सोडा घालायचा. चवीनुसार मीठ घालायचं, थोडं जिरं घालायचं. सगळं मिक्स करायचं. मग त्यात थोडं थोडं असं पाणी घालायचं आणि ढवळून घ्यायचं. सगळं मिक्स करायचं. छान एकजीव करायचं. 

३. थोडं तेल गरम करायचं. मिश्रणात ओतायचं. भरपूर कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घालून झाल्यावर मिश्रण एकजीव करुन घ्यायचं. जास्त पातळ नाही जरा घट्टच ठेवायचं. कढईत तेल गरम करायचं. गरम तेलात चमच्याच्या मदतीने किंवा हाताने गोलाकार भजी सोडायची. मस्त कुरकुरीत खमंग तळून घ्यायचे. हिरवी चटणी किंवा सॉससोबत खा.      

English
हिंदी सारांश
Web Title : Crispy Coriander Pakoda Recipe: A Flavorful, Must-Try Snack

Web Summary : Enjoy tea with crispy coriander pakodas! This easy recipe uses fresh coriander, gram flour, rice flour, ginger, garlic, and spices. Mix, fry until golden, and serve hot with chutney or sauce for a tasty treat.
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्ससमर स्पेशल