Join us
Daily Top 2Weekly Top 5

गूळ घालून करा घट्ट चविष्ट शेवयांची खिर-पाहा खास रेसिपी-गूळ वाढवतो चव, रेसिपी अगदी सोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2026 18:50 IST

Make thick and tasty savay kheer by adding jaggery - see special recipe - jaggery enhances the taste, recipe is very simple : चविष्ट शेवयांची खीर करा. गुळाने वाढते चव.

शेवयांची खीर म्हटलं की जिभेवर लगेच त्याची यायला लागते. साखर घालून केलेली शेवयांची खीर आपण नेहमीच खातो पण हीच खीर गूळ घालूनही करता येते, आणि खरं तर गुळामुळे तिची चव अधिक समृद्ध आणि पारंपरिक वाटते. साखरेऐवजी गूळ वापरल्याने खिरीला जरा वेगळी चव येते, रंग थोडासा तपकिरीसर होतो आणि खीर घट्टही होते. (Make thick and tasty savay kheer by adding jaggery - see special recipe - jaggery enhances the taste, recipe is very simple)गुळाचा वापर हा आपल्या पारंपरिक आहारसंस्कृतीचा भाग आहे. साखरेपेक्षा गूळ कमी प्रक्रियायुक्त असल्यामुळे त्यात लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम यांसारखी काही खनिजे अंशतः टिकून राहतात. त्यामुळे गूळ घातलेली शेवयांची खीर केवळ चविष्टच नव्हे, तर तुलनेने थोडी अधिक पौष्टिकही ठरते. विशेषतः सणासुदीच्या दिवशी गुळाची खीर करायला हरकत नाही.

साहित्य शेवया, गूळ, दूध, काजू, बदाम, तूप, बेदाणे, वेलची पूड

कृती१. एका कढईत थोडे तूप घ्यायचे. शेवयांचे तुकडे करायचे आणि तुपावर शेवया परतून घ्यायच्या. हलक्याच परतायच्या. नंतर शेवया गार करत ठेवायच्या. बदामाचे तुकडे करायचे. तसेच काजूचेही तुकडे करायचे. कढईत तूप घेऊन त्यावर बदामाचे तुकडे, काजूचे तुकडे आणि बेदाणे तुपावर परतायचे.  २. गूळ छान किसून घ्यायचा. कढईत तूप घ्यायचे. त्यावर पुन्हा शेवया घालायच्या मात्र परतत बसायची गरज नाही त्यात दूध ओतायचे. वाटीभर शेवयांना वाटीभर दूध असे प्रमाण घ्यायचे. दूध जरा उकळले की त्यात किसलेला गूळ घालायचा. गूळ विरघळेपर्यंत ढवळत राहायचे. त्यात वेलची पूड घालायची. परतलेला सुकामेवा घालायचा. झाकण ठेवायचे एक वाफ काढायची. 

३. नंतर झाकण काढून टाका आणि खीर मस्त उकळू द्या. गरमागरम खायची. चवीला फार छान लागते. गुळाचे प्रमाण आवडीनुसार ठरवायचे. कमी जास्त तुम्हाला जसे हवे तसे. फक्त गूळ पूर्ण मिक्स होईल याची काळजी घ्यायची.  

English
हिंदी सारांश
Web Title : Jaggery Shevaya Kheer: A Simple, Delicious, and Nutritious Recipe

Web Summary : Make delicious Shevaya Kheer with jaggery for a richer, traditional taste. Jaggery offers minerals and a unique flavor, making this dessert both tasty and comparatively healthier. A perfect sweet treat for festivals!
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स