Join us
Daily Top 2Weekly Top 5

जॅमची बिस्किटं खाऊन मुलांना खोकला होतो? मग घरी ‘अशी’ करा बटरी स्वीट जॅम बिस्किट, करायला सोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2026 14:53 IST

Make these buttery sweet jam biscuits at home, easy to make, homemade is always better than bough ones : विकतची जॅम बिस्कीटे खाऊ नका. घरीच करा चविष्ट.

मऊ, खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारे बटर जॅम बिस्कीट म्हटलं की मुलांचा चेहरा लगेच उजळतो. बटरचा छान सुगंध आणि मधे असलेला गोड जॅम यामुळे ही बिस्कीट्स लहान मुलांना विशेष आवडतात. शाळेतून आल्यावर किंवा संध्याकाळच्या खाऊसाठी अशी बिस्कीट्स मिळाली, तर मुलांचा आनंद गगनात मावेनासा होतो. (Make these buttery sweet jam biscuits at home, easy to make, homemade is always better than bough ones )विकत अशी बिस्कीट आणण्यापेक्षा घरीच ताजी आणि जास्त बटरी करता येतात.  घरी केलेली बटर जॅम बिस्कीट्स म्हणजे प्रेमाने केलेला खाऊ असतो. बाजारातल्या बिस्कीट्सपेक्षा ही बिस्कीट्स अधिक ताजी, मऊ आणि चविष्ट लागतात. करायलाही सोपी आहेत. आवडीचा कोणताही जॅम वापरुन तयार करता येतात. पाहा सोपी रेसिपी. 

साहित्य बटर, पिठीसाखर, दूध, मैदा, मीठ, व्हॅनिला इसेंस, जॅम (कोणताही)

कृती१. थोडे बटर वितळवायचे आणि परातीत घ्यायचे. त्यात पिठीसाखर घालायची. अर्धी वाटी बटर घ्यायचे आणि तेवढीच पिठीसाखर. मिश्रण फेटायचे. त्याची घट्ट पेस्ट होते. मग त्यात मैदा चाळून घालायचा. वाटीभर किंवा जास्तही लागतो. त्यात पाव वाटी दूध घालायचे. थोडा व्हॅनिला इसेंस घालायचा. चिमूटभर मीठ घालायचे.

२. त्याचे पीठ मळून घ्यायचे. जसे पोळीसाठी मळता अगदी तसेच. जरा घट्ट मळले तरी चालेल. मैदा घालतानाच मिळत राहा. जास्त पातळ किंवा घट्ट होणार नाही. त्याची जाडसर पोळी लाटायची. शेप देण्यासाठी वाटी किंवा झाकण काहीही वापरु शकता. पोळी लाटल्यावर त्याचे लहान तुकडे गोल पाडायचे. मधे लहान गोल तयार करायचा.

३. तयार केलेले गोल बेक करायचे. १५ ते २० मिनिटे बेक करा. नंतर त्याला एका बाजूने बटर लावायचे. दोन तुकडे एकमेकांना जोडून त्याचे बिस्कीट तयार करायचे. मधे ठेवलेल्या लहान गोलात जॅम भरायचा. छान खमंग कुरकुरीत होतात.   

English
हिंदी सारांश
Web Title : Homemade Jam Biscuits: Easy, Buttery Recipe for Kids' Happiness

Web Summary : Delight kids with homemade buttery jam biscuits! This simple recipe uses butter, sugar, flour, milk, vanilla, and any jam you like. Bake, add jam, and enjoy fresh, soft, and delicious treats, better than store-bought.
टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सपाककृती