Join us

वडापावच्या गाडीवर मिळते अगदी तशीच खंमग लसूण चटणी करा घरीच, सोपी चविष्ट रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2025 16:33 IST

Make the same authentic garlic chutney as you get at the Vada Pav stall, an easy and tasty recipe make at home : घरीच करा चविष्ट लसूण चटणी. विकतपेक्षा भारी.

वडापाव फक्त पदार्थ नाही तर महाराष्ट्रातील लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या पदार्थावर लोकांचे प्रेम आहे. चव जबरदस्त असतेच. शिवाय वडापाव सगळ्यांनाच परवडतो. पोटभरीचा असतो. त्यामुळे तो जागोजागी मिळतो. (Make the same authentic garlic chutney as you get at the Vada Pav stall, an easy and tasty recipe at home)त्यासोबत मिळणारी लसणाची चटणीही फार प्रसिद्ध असते. वडापावसोबत मिळणारी लसूण चटणी ही खाणाऱ्यांच्या जि‍भेवर राज्य करणारी खास चव आहे. तिचा तिखट, झणझणीत आणि सुगंधी स्वाद वड्यासोबत अगदी मस्त लागतो. कोरडी लसूण चटणी वडापावसोबत खायलाच हवी. मात्र घरी केलेली लसूण चटणी तशी लागत नाही. कारण त्याची रेसिपी वेगळी असते. 

साधी लसूण चटणी आणि वडापावसोबतची लसूण चटणी वेगळी असते. त्यामुळे एकदा अशी चटणी नक्की करुन पाहा. चवीला अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच लागते. करायलाही सोपी आहे. नक्की करुन पाहा. घरीच करा आणि मनसोक्त खा. 

साहित्य लसूण, सुकं खोबरं, बेसन ,पाणी, तेल, मीठ, लाल तिखट

कृती१. एका खोलगट भांड्यात बेसन घ्यायचे. त्यात पाणी घालायचे. थोडे मीठ घालायचे. ढवळायचे. मिक्स करायचे. मध्यम पातळ करायचे. कढईत तेल तापवायचे. आणि हाताने त्यात बेसन पीठ सोडायचे. चुरा खमंग तळून घ्यायचा. तळून झाल्यावर काढून घ्यायचा. गार होऊ द्यायचा. 

२. चुरा गार होईपर्यंत लसणाच्या पाकळ्या सोलून घ्या. त्यात तळून घ्या. लसूण भरपूर घ्यायचा. सुक्या खोबऱ्याचे बारीक तुकडेही तळायचे. सगळे पदार्थ खमंग तळल्यावर गार करायचे. मग मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे. त्यात लाल तिखट घालायचे. थोडे मीठ घालायचे. चुरा घालायचा. तसेच लसणाच्या पाकळ्या घाला. सुकं खोबरं घाला, मस्त चटणी वाटून घ्या.  

English
हिंदी सारांश
Web Title : Make vada pav stall-style garlic chutney easily at home.

Web Summary : Vada pav's famous garlic chutney is a must-try. This recipe helps you recreate the authentic, spicy, and flavorful chutney at home. It's easy to make with simple ingredients like garlic, coconut, and red chili powder.
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स