तवा फ्राय भाजी विविध प्रकारे करता येते. एकदा या पद्धतीने नक्की करुन पाहा. चवीला एकदम मस्त आणि करायला फार सोपी आहे. (Make tawa masala bhaji at home, tastier than hotel, 15minute recipe )तसेच आवडत्या कोणत्याही भाज्या वापरुन करा. मसाला करतानाह फक्त काळजी घ्या. पाहा काय करायचे.
साहित्य भेंडी, कांदा, बटाटा, टोमॅटो, लसूण, तोंडली, वांगी, मशरुम, पनीर, फुलकोबी, फरसबी, गाजर, हळद, लाल तिखट, गरम मसाला, मीठ, कांदा - लसूण मसाला, काळीमिरी, दालचिनी, तमालपत्र, जिरं, मोहरी, तेल, कोथिंबीर, पाणी, हिरवी मिरची , लिंबू
कृती१. भेंडी लांब-लांब चिरुन घ्यायची. बटाटा सोलायचा त्याचेही लांब काप करायचे. मशरुमचे तुकडे करायचे. जास्त लहान नको, मोठे तुकडेच करायचे. तोंडलीचे तुकडे करायचे. लांब काप करायचे. पनीरचेही लांब काप करायचे. फरसबीचे लांब तुकडे करायचे. फुलकोबीचे मध्यम आकाराचे तुकडे करायचे. गाजर सोलायचे. त्याचेही मध्यम आकाराचे लांब काप करायचे.
२. कांदा सोलायचा. छान बारीक चिरायचा. लसणाच्या काही पाकळ्या सोलायच्या. आल्याचा तुकडा घ्यायचा. तसेच हिरवी मिरची घ्यायची. त्याची पेस्ट तयार करायची. लसूण - मिरची - आलं ही पेस्ट तयार करायची.
३. तव्यावर थोडे तेल घ्यायचे. तेलावर भेंडीचे काप परतून घ्यायचे. परतल्यावर काढून घ्यायचे. बटाटा परतायचा, फुलकोबी परतायचा, मशरुमही परतून घ्यायचे. वांगी छान परतायची. फरसबी परतायची. तसेच तोंडलीही परतायची. गाजर परतायचे. पनीर परतायचे. सगळ्या भाज्या परतून झाल्यावर त्याच तव्यावर तेलात जिरे घालायचे. जिरं फुलल्यावर मोहरी घालायची. मोहरी तडतडू द्यायची. काळीमिरी , दालचिनी, तमालपत्र घाला. मग त्यात आलं-लसूण-हिरवी मिरची पेस्ट घाला. परतून घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा घाला. टोमॅटोची पेस्ट करायची. ती पेस्टही घाला. त्यात चवी पुरते मीठ घाला. चमचाभर हळद घाला. तसेच चमचाभर लाल तिखट घालायचे. कांदा-लसूण मसाला घालायचा. परतून घ्यायचे. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. थोडे पाणी घाला. मसाला छान घट्ट झाला की त्यात भाज्या घाला आणि परतून घ्या.
४. त्यात लसणाच्या काही पाकळ्याही घाला. चवीला छान लागतात. तसेच भाजीवर लिंबू पिळा. लिंबाच्या रसाने चव छान येते. गरमागरम तवा मसाला करायला अगदी सोपा आहे. तसेच याच भाज्या घ्यायला हव्या असे नाही. तुमच्या आवडीनुसार भाज्या घ्या.
Web Summary : Create delicious tawa masala bhaji at home with your favorite vegetables. Sauté vegetables, prepare a spicy masala with ginger-garlic paste, and mix. Add lemon and coriander for enhanced flavor; a simple and customizable recipe.
Web Summary : घर पर स्वादिष्ट तवा मसाला भाजी बनाएं, अपनी पसंदीदा सब्जियां इस्तेमाल करें। अदरक-लहसुन पेस्ट के साथ मसाले तैयार करें, सब्जियां भूनें और मिलाएं। नींबू और धनिया से स्वाद बढ़ाएं; एक सरल और अनुकूलन योग्य रेसिपी।