Join us

वाफाळत्या भातावर वाढा पळीभर कसूरी मेथीचं वरण, स्वाद आणि पोषण दोन्ही एकत्र- खवळते भूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2025 17:39 IST

Make tasty and healthy kasuri methi varan, rice and this varan is perfect combo for comfort food : पोटाला फार बरं वाटेल हे वरण खाल्यावर. पाहा मस्त रेसिपी.

भात हा आहाराचा फार महत्त्वाचा भाग आहे. महाराष्ट्रातील लोकांना तर जेवताना घासभर तरी भात हवा असतो. त्याची सवय असते. त्यामुळे भात भारतातील मुख्य अन्नापैकी एक मानले जाते. (Make tasty and healthy kasuri methi varan, rice and this varan is perfect combo for comfort food  )मात्र भातासोबत काय करायचे असा प्रश्न सारखा पडतो. वेगवेगळ्या वरणाच्या आणि आमटीच्या रेसिपी आपण करतच असते. तशीच एक मस्त रेसिपी म्हणजे कसूरी मेथीचे वरण. अगदी साध्या प्रकारे करता येते आणि पौष्टिकही असते. नक्की करुन पाहा.  

साहित्य कसूरी मेथी, मूग डाळ, चणा डाळ, मसूर डाळ, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, लाल तिखट, आलं, जिरे, मोहरी, हिंग, पाणी, काश्मीरी लाल मिरची, तेल, कडीपत्ता 

कृती१. चणा डाळ मसूर डाळ आणि मूग डाळ समप्रमाणात घ्यायची. सम प्रमाणात नको असेल तर जी डाळ जास्त आवडते ती जास्त घ्या आणि इतर थोड्या घ्या. डाळी एकदम स्वच्छ धुवायच्या. दोन ते तीनदा पाण्यातून काढायच्या. थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवायच्या. 

२. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. तसेच कोथिंबीरीची ताजी जुडी घ्यायची आणि छान निवडायची. कोथिंबीर अगदी बारीक चिरुन घ्यायची. आल्याचा तुकडा किसून घ्यायचा. कुकरमध्ये मिश्रीत डाळी शिजवून घ्यायच्या. एखादी शिटी जास्त काढा म्हणजे सगळ्या डाळी शिजतील.

३. एका कढईत किंवा खोलगट भांड्यात थोडे तेल घ्यायचे. तेल गरम झाल्यावर त्यात थोडे जिरे घालायचे. तसेच थोडी मोहरी घालायची. जिरं आणि मोहरी मस्त खमंग परतून घ्यायचे. त्यात कडीपत्ता घालायचा. तसेच लसणाच्या पाकळ्या घालायच्या. थोडे हिंग घालायचे, किसलेले आले घालायचे. हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आणि छान परतायचे. सारे पदार्थ मस्त परतल्यावर कोथिंबीर घाला आणि खमंग परता. फोडणीच थोडी हळद घाला, चमचाभर तिखट घाला आणि लगेच त्यात डाळी घाला. 

४. त्यात थोडे पाणी घाला. मस्त उकळी येऊ द्यायची. चवी पुरते मीठ घालायचे. थोडावेळ झाकून ठेवायचे नंतर हातावर कसूरी मेथी घ्यायची. जरा छान चुरायची आणि मग वरणात घालायची. वरण उकळू द्यायचे. अगदीच जास्त उकळू नका कडवटपणा येईल. त्यामुळे योग्य तेवढेच उकळा. गरमागरम वरण आणि भात खा. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स