Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > पाच मिनिटांत करा आंबट - तिखट लेमन राइस, पचनासाठी उत्तम आणि कितीही खाल्ला तरी मन भरत नाही ....

पाच मिनिटांत करा आंबट - तिखट लेमन राइस, पचनासाठी उत्तम आणि कितीही खाल्ला तरी मन भरत नाही ....

Make Tangy and Spicy Lemon Rice in Just 5 Minutes – Great for Digestion and So Delicious : चवीला मस्त आणि करायला सोपा असा लेमन राइस नक्की खा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2026 15:38 IST2026-03-31T15:36:43+5:302026-03-31T15:38:58+5:30

Make Tangy and Spicy Lemon Rice in Just 5 Minutes – Great for Digestion and So Delicious : चवीला मस्त आणि करायला सोपा असा लेमन राइस नक्की खा.

Make Tangy and Spicy Lemon Rice in Just 5 Minutes – Great for Digestion and So Delicious | पाच मिनिटांत करा आंबट - तिखट लेमन राइस, पचनासाठी उत्तम आणि कितीही खाल्ला तरी मन भरत नाही ....

पाच मिनिटांत करा आंबट - तिखट लेमन राइस, पचनासाठी उत्तम आणि कितीही खाल्ला तरी मन भरत नाही ....

दक्षिण भारतातील पारंपरिक आणि अतिशय लोकप्रिय पदार्थांपैकी एक म्हणजे लेमन राइस (Lemon Rice). साधा, झटपट आणि चविष्ट असा हा भात अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो, तामिळनाडू मध्ये एलुमिचाई साधम, कर्नाटक मध्ये चित्रान्न, तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा मध्ये निम्मकाया पुलिहोरा असे त्याला म्हटले जाते. हा भात मुख्यतः लिंबाच्या आंबट-ताज्या चवीमुळे ओळखला जातो. (Make Tangy and Spicy Lemon Rice in Just 5 Minutes – Great for Digestion and So Delicious)त्यात मोहरी, कडीपत्ता, शेंगदाणे, हळद यांसारख्या घटकांचा वापर केल्यामुळे त्याला एक खास सुगंध आणि रंग येतो. विशेष म्हणजे हा पदार्थ केवळ चविष्टच नाही तर पचायला हलकाही असतो, त्यामुळे तो रोजच्या जेवणात तसेच प्रवासासाठीही उत्तम पर्याय मानला जातो. करायला अगदीच सोपा आहे, पाहा रेसिपी. 

साहित्य 
लिंबू, शेंगदाणे, भात, तेल, चणाडाळ, उडीद डाळ, कडीपत्ता, काजू, मोहरी, आलं, हळद, मीठ, हिरवी मिरची, कोथिंबीर, सुकी मिरची

कृती
१. ताजा भात न वापरता शिळा वापरला तर चव जास्त छान लागते. त्यामुळे दुपारचा भात रात्री किंवा रात्रीचा भात नाश्त्याला असा वापरा. हिरव्या मिरचीचे तुकडे करुन घ्यायचे. आलं किसून घ्यायचं. सुक्या मिरचीचे तुकडे करायचे. कोथिंबीर निवडायची आणि बारीक चिरायची. 

२. कढईत तेल घ्यायचं, त्यात शेंगदाणे घालायचे आणि परतून घ्यायचे. तसेच त्यात काजू परतून घ्यायचे. नंतर त्यात थोडी मोहरी घालायची. सुकी मिरची घालायची, कडीपत्ता घालायचा. चणाडाळ घालायची. तसेच थोडी उडदाची डाळही घालायची. हिरवी मिरची घालायची आणि सगळं परतून घ्यायचं. त्यात परतून ठेवलेले काजू आणि शेंगदाणे घालायचे. फोडणी खमंग झाली की त्यात आलं घाला आणि हळद घाला. अगदी चमचाभर पाणी घालून परतून घ्यायचं. 

३. भात जरा मोकळा करायचा आणि फोडणीत घालायचा. त्यात लिंबाचा रस पिळायचा. अर्धी वाटी लिंबू रस घालायचा. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, चवीनुसार मीठ घालायचे. सगळं मिक्स करा आणि त्यावर झाकण ठेवा. मस्त एक वाफ काढून घ्यायची, गरमागरम भात खा. 

Web Title : झटपट नींबू चावल रेसिपी: पचाने में आसान, कभी भी खाओ, स्वादिष्ट।

Web Summary : नींबू चावल, एक दक्षिण भारतीय पसंदीदा, झटपट, स्वादिष्ट और हल्का है। यह नींबू का रस, सरसों के बीज, करी पत्ते, मूंगफली और हल्दी के साथ तैयार किया जाता है, जो इसे भोजन और यात्रा के लिए एक स्वादिष्ट और आसानी से पचने वाला विकल्प बनाता है। आसानी से मिलने वाली सामग्री के साथ एक सरल रेसिपी।

Web Title : Quick, tangy lemon rice recipe: Easy to digest, delicious anytime.

Web Summary : Lemon rice, a South Indian favorite, is quick, flavorful and light. It's prepared with lemon juice, mustard seeds, curry leaves, peanuts, and turmeric, making it a tasty and easily digestible option for meals and travel. A simple recipe with readily available ingredients.