Join us

साखर न घालता करा खजूराचे गोड लाडू - अगदी सोपी रेसिपी, पोषक घटकांनी भरलेले हे लाडू नक्कीच करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2025 18:05 IST

Make sweet date laddu without adding sugar - a very simple recipe, definitely make these laddus full of nutrients : चविष्ट आणि पौष्टिक खजूर लाडू रेसिपी.

खजूर नैसर्गिक गोड असून त्यात लोह, पोटॅशियम आणि फायबर असते. त्यामुळे ऊर्जा वाढते आणि रक्तशुद्धीला मदत होते. बदाम, काजू, पिस्ते, अक्रोड यामध्ये प्रथिने, ओमेगा-३ फॅटी ऍसिडस् आणि चांगले फॅट्स असतात. (Make sweet date laddu without adding sugar - a very simple recipe, definitely make these laddus full of nutrients)जे मेंदूची कार्यक्षमता वाढवतात आणि हृदयासाठीही लाभदायक ठरतात. सुकं अंजीर पचन सुधारते आणि कॅल्शियम पुरवते. या लाडूंमध्ये साखर अजिबात नसते, त्यामुळे ते डायटिंग करणाऱ्यांसाठी व मुलांसाठीही उत्तम आहेत. शिवाय करायला अगदी सोपे आहेत. 

साहित्यखजूर, बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता, अंजीर, खोबरं, तूप, वेलची पूड, खारीक  

खजूर १ वाटीबदाम अर्धी वाटीकाजू अर्धी वाटीअक्रोड अर्धी वाटीपिस्ते अर्धी वाटीसुकं अंजीर ४ ते ५चार चमचे सुकं खोबरंचमचाभर वेलची पूड४ ते ५ खारीक 

कृती१. खजूराच्या बिया काढून घ्यायच्या. खारीकेच्या सुद्धा बिया काढून घ्यायच्या. खोबरं छान भाजून घ्यायचं. तसेच चमचाभर तुपावर बदाम परतायचे. त्याचप्रमाणे काजू परतायचे. सारे पदार्थ थंड करुन घ्यायचे. खारीक हलकीशी परतायची. 

२. एका मिक्सरच्या भांड्यात परतलेले काजू, बदाम, खोबरं, खारीक घ्या. त्यात वाटीभर अक्रोड घाला. चार ते पाच अंजीर घाला. चमचाभर वेलची पूड घाला. थोडे पिस्ते घाला. सगळे पदार्थ छान वाटून घ्या. त्यात थोडे तूप घाला. अगदीच लगदा करु नका. जरा जाडसर वाटा. 

३. हाताला तूप लावा आणि त्याचे लहान-लहान लाडू करुन घ्या. हे लाडू किमान १५ ते २० दिवस टिकतात. त्यापेक्षा टिकत नाहीत. त्यामुळे पटापट खाऊन संपवा. नक्की करुन पाहा.  

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स