भरली, वांगी, भरली तोंडली तसेच बटाटा, भेंडी, सिमला मिरची या भाज्या नक्कीच खाल्या असतील. चवीला खुप छान लागतात. चविष्ट सारण भरुन या भाज्या केल्या जातात. करायला अगदीच सोप्या असतात. (Make stuffed chilies 'like this', such a unique recipe that you will love the taste, must try )इतरही अनेक भाज्या अशा भरुन करता येतात. त्यापैकी एक म्हणजे भरली मिरची. याला भरवी मिरची , मसाला मिरची असेही म्हटले जाते. ही रेसिपी अगदी चविष्ट असते. करायला जास्त वेळही लागत नाही. तसेच मिरची जाड वापरायची. रोजच्या वापराची हिरवी मिरची नाही. पाहा चमचमीत रेसिपी.
साहित्य
बेसन, तेल, शेंगदाण्याचे कुट, धणे- जिरे पूड, लाल तिखट, हळद, जाड मिरची, मीठ, पाणी.
कृती
१. पॅनमध्ये तेल घ्यायचे. त्यावर बेसन परतायचे. छान खमंग परता. त्यात चमचाभर हळद घाला. सतत ढवळायचे. न थांबता परतायचे, म्हणजे बेसन जळत नाही. बेसन छान परतून झाल्यावर गार करत ठेवायचे.
२. जाड मिरची चिरायची. तुकडे करु नका. फक्त लांब काप द्या. त्यातील बिया काढून घ्या. त्यात थोडे मीठ भरा. अगदी किंचित मीठ भरायचे. म्हणजे मिरची अति तिखट लागत नाही. जर जास्त तिखट आवड नसेल तर मिरच्या चिरल्यावर पाण्याखाली धरा. धुऊन घ्या.
३. बेसनमध्ये चमचाभर मीठ, चमचाभर लाल तिखट, चमचाभर धणे - जिरे पूड घाला. चांगले तीन - चार चमचे शेंगदाण्याचे कुट घाला. ढवळून घ्या. त्यात अगदी थोडे पाणी घाला आणि ढवळून घ्या. पाणी न घालता तेल घातले तरी चालेल.
४. जरा खोलगट असा तवा गरम करत ठेवा. त्यावर तेल पसरवा. तवा गरम होईपर्यंत मिरचीमध्ये मसाला भरुन घ्यायचा. एक-एक करुन मिरची तव्यावर लावायची. दोन्ही बाजूंनी खमंग परतायची. फार चविष्ट होते.
