सिमला मिरचीची भाजी सगळ्यांनाच आवडते असे नाही. मात्र एकदा ही रेसिपी करुन पाहा सिमला मिरची आवडती होऊन जाईल. करायला अगदी सोपी आहे. शिवाय घरी उपलब्ध असलेले साहित्य वापरुन करता येते. भरली वांगी करता तशी एकदा भरली सिमला मिरची करुन पाहा. (Make stuffed capsicums with a spicy potato filling, a recipe you've never tasted before.)बटाट्याचे सारण भरुन केलेली ही भाजी नुसती खायलाही मस्त लागते.
साहित्य तेल, जिरे, हिंग, लसूण, हिरवी मिरची, कांदा, हळद, बटाटा, लाल तिखट, धणे पूड, कोथिंबीर, सिमला मिरची, गरम मसाला, आमचूर पूड, मीठ
कृती१. हिरवी मिरची एकदम बारीक चिरायची. लसणाच्या पाकळ्या सोलून घ्या. त्याची पेस्ट करा किंवा बारीक चिरा. कांदा सोलायचा आणि बारीक चिरायचा. तसेच कोथिंबीरीची ताजी जुडी घ्यायची. बारीक चिरायची. सिमला मिरची घ्यायची. त्याचे देठ कापायचे. आतील बिया काढायच्या आणि सिमला मिरची अख्खीच ठेवायची. बटाटे उकडून घ्यायचे. साले सोलून घ्यायची. बटाटा कुस्करुन घ्यायचा.
२. एका कढईत थोडे तेल घ्यायचे. तेलात जिरे घाला आणि फुलू द्या. नंतर त्यात हिंग पूड घालायची. तसेच बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची. लसूणही घालायचा. मस्त खमंग परता मग त्यात बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा गुलाबी परतायचा. मग त्यात उकडेला आणि व्यवस्थित कुस्करलेला बटाटा घालायचा. त्यात चमचाभर हळद घालायची. चवीनुसार मीठ घालायचे. तसेच चमचाभर लाल तिखट आणि चमचाभर गरम मसाला घालायचा. आमचूर पूडही घाला थोडी धणे पूड घाला आणि मिक्स करा.
३. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. मसाला छान एकजीव करायचा. मग गार करत ठेवायचा. गार झाल्यावर सिमला मिरचीमध्ये भरायचा. पसरट पॅनमध्ये तेल घ्यायचे. त्यावर सिमला मिरची परतून घ्यायची. झाकण ठेवायचे आणि वाफ काढून घ्यायची. दोन्ही बाजूंनी छान खमंग परता. भातासोबत किंवा चपातीसोबत मस्त लागते.
Web Summary : Make stuffed capsicums with a spicy potato filling. This easy recipe uses readily available ingredients. Prepare the potato mixture, stuff it into capsicums, and pan-fry until tender. Enjoy this flavorful dish with rice or roti.
Web Summary : मसालेदार आलू भरकर शिमला मिर्च बनाएं। यह आसान रेसिपी आसानी से उपलब्ध सामग्री का उपयोग करती है। आलू का मिश्रण तैयार करें, इसे शिमला मिर्च में भरें और नरम होने तक पैन-फ्राई करें। इस स्वादिष्ट व्यंजन को चावल या रोटी के साथ परोसें।