Lokmat Sakhi >Food > मसालेदार तवा पनीर पुलाव करा ‘असा’ झटपट, या पद्धतीने घरी केला तर विकतचा पुलाव विसराल कायमच

मसालेदार तवा पनीर पुलाव करा ‘असा’ झटपट, या पद्धतीने घरी केला तर विकतचा पुलाव विसराल कायमच

Make spicy tawa paneer pulao 'like this' in no time, if you make it at home this way everyone will love it : घरीच करा मस्त चमचमीत तवा पनीर पुलाव.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2025 13:50 IST2025-09-16T13:42:30+5:302025-09-16T13:50:37+5:30

Make spicy tawa paneer pulao 'like this' in no time, if you make it at home this way everyone will love it : घरीच करा मस्त चमचमीत तवा पनीर पुलाव.

Make spicy tawa paneer pulao 'like this' in no time, if you make it at home this way everyone will love it | मसालेदार तवा पनीर पुलाव करा ‘असा’ झटपट, या पद्धतीने घरी केला तर विकतचा पुलाव विसराल कायमच

मसालेदार तवा पनीर पुलाव करा ‘असा’ झटपट, या पद्धतीने घरी केला तर विकतचा पुलाव विसराल कायमच

पनीर पुलाव नक्कीच खाल्ला असेल. विकतपेक्षा मस्त चवीला पुलाव घरी करता येतो. अगदी सोपी रेसिपी आहे. योग्य प्रमाणात भाज्या शिजल्या आणि चांगल्या दर्जाचे पनीर वापरले की मस्त असा पुलाव करता येतो. (Make spicy tawa paneer pulao 'like this' in no time, if you make it at home this way everyone will love it)तसेच बासमती तांदूळ शिजवताना तो या रेसिपी नुसार शिजवा म्हणजे मस्त मोकळा होईल. 

साहित्य 
पनीर, बासमती तांदूळ, पाणी, कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, लसूण, बटर, कोथिंबीर, मटार मीठ, हळद, तेल, काश्मीरी लाल मिरची, हिरवी मिरची, आलं, जिरं, गरम मसा , धणे-जिरे पूड, लिंबू, गाजर  

कृती
१. एका पातेल्यात पाणी उकळत ठेवा. त्यात चमचाभर मीठ घाला. तसेच चमचाभर हळद घाला आणि पाणी छान उकळू द्या. पातेलं भर पाणी ठेवा. कमी नको. बासमती तांदूळ जरा धुवायचा आणि हलकासा परतायचा. नंतर तो त्या उकळत्या पाण्यात घाला आणि एक वाफ काढून घ्या. भात शिजल्यावर पाण्यातून झाऱ्याच्या मदतीने काढून घ्या. पाणी पूर्ण जिरायची वाट पाहू नका. जास्तीचे पाणी काढून टाका म्हणजे भात एकदम मोकळा होतो. अगदी मऊ होईपर्यंत उकळवू नका. 

२.  भिजवलेली काश्मीरी लाल मिरची एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायची. त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घाला तसेच लसणाच्या काही पाकळ्या घाला आणि आल्याचा लहानसा तुकडा घाला. त्यात अगदी थोडे पाणी घालायचे आणि पेस्ट करायची. कांदा सोलायचा आणि लांब चिरायचा. तसेच सिमला मिरचीही लांब चिरायची. मटारचे दाणे मस्त शिजवायचे किंवा उकळून घ्यायचे. गाजराचे लहान तुकडे करायचे. टोमॅटोच्या बिया काढा आणि त्याचेही लांब काप करा. पनीरचे चौकोनी काप करुन घ्या. 

३. एका मोठ्या खोलगट पॅनमध्ये थोडे तेल घ्या. त्यात थोडे बटरही घाला. त्यावर जिरं मस्त परतून घ्यायचं. नंतर त्यावर कांदा परतायचा. कांदा जरा गुलाबी झाल्यावर त्यात आलं-लसूण पेस्ट घालायची आणि जरा परतायची. मग त्यात इतरही भाज्या घाला. सगळं छान परता. पनीर घाला आणि जरा एक वाफ काढून घ्या. पनीर जर कुरकुरीत करायचे असेल तर वेगळे परतून घ्या. 

४. भाज्या जरा शिजल्यावर त्यात तयार केलेली लाल मिरचीची पेस्ट घालायची. तसेच मीठ घालायचे, हळद आणि इतरही मसाले घालायचे. मस्त परतायचे आणि मग त्यात भात घालायचा. एकजीव करुन घ्यायचा. त्यात वरतून लिंबाचा रस पिळायचा. एक वाफ काढायची आणि मस्त गरमागरम खायचा.   


Web Title: Make spicy tawa paneer pulao 'like this' in no time, if you make it at home this way everyone will love it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.