Join us
Daily Top 2Weekly Top 5

झणझणीत सुकी शेंगदाणा चटणी करा दहा मिनिटांत , चव एवढी भन्नाट की भाजी नसली तरी चालेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2025 15:17 IST

Make spicy peanut chutney in ten minutes, the taste is so amazing , must try : शेंगदाणा चटणी करायची सोपी पद्धत.

शेंगदाणा चटणी ही  घरोघरी आवडीने खाल्ली जाणारी चटणी आहे. तिची चव एकदम मस्त असते. तसेच झणझणीत असते. त्यामुळे असल्यामुळे ती भाकरी, डोसा, इडली, पोळी किंवा अगदी भातासोबतही छान लागते. करायला खूप सोपी असल्यामुळे रोजच्या जेवणात पटकन करता येते.

शेंगदाण्यात प्रथिने, चांगले फॅट्स, व्हिटॅमिन ई आणि फायबर मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे ही चटणी फक्त चवीला नाही तर आरोग्यासाठीही उपयुक्त ठरते. ती शरीराला ऊर्जा देते, पोट भरल्यासारखे वाटते आणि दीर्घकाळ भूक नियंत्रणात ठेवते. भाजी नसेल तर ही चटणी भाजीऐवजी खाता येते.  विविध प्रकारे ही चटणी करता येते. त्यापैकीच एक सोपा आणि चविष्ट प्रकार म्हणजे ही रेसिपी. नक्की करुन पाहा. सगळ्यांनाच आवडेल. करायला सोपी आणि टिकतेही महिनाभर.  साहित्य शेंगदाणे, जिरं, लसूण, लाल तिखट, मीठ, काश्मीरी लाल मिरची 

कृती१. शेंगदाणे भाजून घ्यायचे. भाजून झाल्यावर त्याची सालं काढून घ्यायची. छान भाजायचे. म्हणजे कुरकुरीत होतात. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. शेंगदाणे भाजून झाल्यावर कढईत लसूण भाजायची. त्यासोबत काश्मीरी लाल मिरचीही भाजायची. दोन मिरच्या घ्यायच्या. (Make spicy peanut chutney in ten minutes, the taste is so amazing , must try)जास्त नको कारण लाल तिखट आणि मिरची दोन्ही घेतल्याने तिखट अति होते. दोन चमचे जिरेही भाजायचे. सारे पदार्थ मंद आचेवर छान भाजून घ्यायचे. 

२. नंतर एका मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे घ्यायचे. त्यात लसूण, जिरं , लाल मिरची सारे घालायचे. चमचाभर लाल तिखट घालायचे आणि चवी पुरते मीठ घालायचे. सारे पदार्थ एकत्र करायचे आणि मग मस्त वाटून घ्यायचे. जरा जाडसर वाटायचे म्हणजे चटणी जास्त छान लागते. वाटून झाल्यावर हवाबंद डब्यात काढून घ्यायचे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Quick, spicy peanut chutney recipe: Ready in ten minutes!

Web Summary : This easy peanut chutney is a flavorful and healthy side dish. Packed with protein, fiber and good fats, it's perfect with roti, dosa, or rice. Ready in minutes, this chutney is a tasty substitute for vegetables and lasts for a month.
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स