Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > जाड मिरचीची झणझणीत आमटी करा दहा मिनिटांत, भातासोबत एकदा आमटी खा, चव जि‍भेवर रेंगाळेल

जाड मिरचीची झणझणीत आमटी करा दहा मिनिटांत, भातासोबत एकदा आमटी खा, चव जि‍भेवर रेंगाळेल

Make spicy chili amti in ten minutes, eat it once with rice, the taste will linger on your tongue : एकदा अशी आमटी नक्की करुन पाहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2025 18:58 IST2025-10-27T18:57:03+5:302025-10-27T18:58:07+5:30

Make spicy chili amti in ten minutes, eat it once with rice, the taste will linger on your tongue : एकदा अशी आमटी नक्की करुन पाहा.

Make spicy chili amti in ten minutes, eat it once with rice, the taste will linger on your tongue | जाड मिरचीची झणझणीत आमटी करा दहा मिनिटांत, भातासोबत एकदा आमटी खा, चव जि‍भेवर रेंगाळेल

जाड मिरचीची झणझणीत आमटी करा दहा मिनिटांत, भातासोबत एकदा आमटी खा, चव जि‍भेवर रेंगाळेल

कधी जाड मिरचीची आमटी केली का ? गरमागरम भात आणि त्यावर मिरचीची आमटी घातली की जेवणाला एक वेगळीच चव येते. तिचा तिखटपणा आणि सुगंध भूक वाढवतो. साधं जेवणही फार रुचकर असू शकतं. (Make spicy chili amti in ten minutes, eat it once with rice, the taste will linger on your tongue)तिखट पदार्थ आवडत असतील तर ही आमटी खास तुमच्यासाठीच आहे, मुळात चवीला छान असते आणि करायलाअगदीच सोपी आहे. 
भाकरीसोबत छान लागते, मात्र भातासोबत एकदम भारी लागते. एखाद्या दिवशी डाळीची आमटी न करता ही आमटी करुन पाहा. नक्की आवडेल. 

साहित्य 
जाड हिरवी मिरची,  मोहरी,  लसूण, पाणी, लाल तिखट, मीठ, लाल मिरची, तमालपत्र, तेल, धणे, जिरे, पिवळी मोहरी, हळद, काळीमिरी, धणे - जिरे पूड 

कृती
१. जाड हिरवी मिरची घ्यायची. स्वच्छ धुवायची आणि मग पुसून घ्यायची. मधोमध कट करायची. तुकडे करु नका. फक्त चिर द्यायची. एका पॅनमध्ये तेल घ्यायचे. तेल जरा गरम झाल्यावर त्यात चमचाभर मोहरी घालायची. तसेच तमालपत्र घालायचे. लसणाच्या पाकळ्या सोलून घालायच्या. त्यात जाड हिरवी मिरची घालायची आणि परतायची. 

२. एका मिक्सरच्या भांड्यात दोन - चार चमचे धणे घ्यायचे. त्यात चार चमचे पिवळी मोहरी घालायची. चार लसणाच्या पाकळ्या घालायच्या. चार चमचे जिरे घाला. सुकी लाल मिरची घाला. काळीमिरी घाला. त्यात थोडे पाणी घाला आणि वाटून घ्या. पेस्ट तयार करा. 

३. मिरची छान परतून झाल्यावर तयार केलेली पेस्ट त्यात ओता. ढवळा आणि छान एकजीव करुन घ्या. त्यात चमचाभर लाल तिखट घाला. तसेच चमचाभर धणे - जिरे पूड घाला. चवी पुरते मीठ घाला आणि ढवळून घ्या. त्यात पाणी ओता आणि जरा आटू द्या. मस्त आमटी तयार होईल. चवीला फारच मस्त असते.  

Web Title : हरी मिर्च की झटपट और मसालेदार अमटी: चावल के साथ लें स्वाद

Web Summary : मिनटों में हरी मिर्च की स्वादिष्ट अमटी बनाएं! चावल या भाकरी के साथ परोसें। हरी मिर्च, सरसों और मसालों का मिश्रण लाजवाब स्वाद देगा। दाल अमटी का बेहतरीन विकल्प।

Web Title : जाड मिरचीची झटपट आणि मसालेदार आमटी: भातासोबत चविष्ट आनंद

Web Summary : चविष्ट हिरव्या मिरचीची आमटी काही मिनिटांत तयार! भातासोबत अप्रतिम, हिरवी मिरची, मोहरी आणि मसाल्यांच्या मिश्रणाने मसालेदार चव. डाळ आमटीला उत्तम पर्याय.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.