जगभरात सध्या चॉकलेट स्ट्रॉबेरी हा पदार्थ फार प्रसिद्ध आहे. तसेच भारतात स्ट्रॉबेरी क्रिम. मात्र महाराष्ट्रात आजही स्ट्रॉबेरी श्रीखंडच जास्त आवडीने खाल्ल जातं. श्रीखंड हा मुळात दह्यापासून तयार होणारा गोड पदार्थ. त्याची गोडसर, मऊ आणि क्रीमी चव अनेकांना आवडते. याच पारंपारिक श्रीखंडाला स्ट्रॉबेरीचा स्ट्विस्ट दिल्यामुळे छान आंबटगोड चव लागते. (Make soft and creamy strawberry shrikhand that melts in mouth, use just 3 ingredients)स्ट्रॉबेरीचा नैसर्गिक गुलाबी रंग आणि फळांचा ताजेपणा श्रीखंडाला अधिक आकर्षक करतो. स्ट्रॉबेरी श्रीखंड लोकप्रिय होण्यामागे सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे. Instagram reels, food blogs आणि dessert reels मध्ये हा पदार्थ सतत दिसू लागल्याने लोकांचे लक्ष वेधले गेले. त्यामुळे सध्या हा पदार्थ फार लोकप्रिय आहे.
साहित्य
दही, स्ट्रॉबेरी, साखर
कृती
१. छान ताजे दही घ्यायचे. गोडसर मस्त दही एका कॉटनच्या पातळ कापडात ओतायचे. त्यातून पाणी काढून टाकायचे. रात्रभर ते बांधून ठेवा आणि पाणी निघून जाऊ द्या. घट्ट बांधा किंवा मग जाळीवर ठेवा आणि वरती वजनदार वस्तू ठेवा. दुसर्या दिवशी सकाळी दही छान सेट झाले असेल.
२. स्ट्रॉबेरी घ्या आणि मीठ तसेच बेकींग सोडा मिक्स केलेल्या पाण्यात ठेवा. छान स्वच्छ धुवा आणि नंतर त्याचे देठ काढून टाका. ट्रॉबेरीचे तुकडे करा आणि एका पॅनमध्ये घ्या. त्यात साखर घाला आणि झाकण ठेवा. उकळू द्या. स्ट्रॉबेरी अगदी मऊ होईल आणि साखर विरघळेल मग गॅस बंद करा आणि चमच्याने जॅम जरा मऊ करुन घ्या. गार करत ठेवा.
३. गार झाल्यावर एका खोलगट पातेल्यात सुकं केलेलं दही घ्या. त्यात तयार केलेली स्ट्रॉबेरी पेस्ट घाला आणि मिक्स करा. ढवळत राहा. बराच वेळ ढवळावे लागते. श्रीखंड छान फेटून घ्यायचे. फेटल्यावर ते मऊ होते. चवीला अगदी मस्त लागते. नक्की करा.
