Join us
Daily Top 2Weekly Top 5

चण्याची चिक्की करा घरीच, इतकी चविष्ट की मुलंही खातील आवडीने कुडूमकुडूम, विसरतील चॉकलेटची चव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2026 17:30 IST

Make protein chikki at home, so tasty that even children will love to eat it : झटपट करा चण्यांची चिक्की. चव आणि प्रोटीन दोन्ही मिळवा.

वाढत्या थकव्यामुळे, स्नायू कमकुवत होतात. वजन नियंत्रण ठेवण्यासाठी बदललेला आहारही शरीराला त्रास देऊ शकतो. पोटभरण्यासाठी प्रोटीनयुक्त पदार्थांना विशेष महत्त्व दिले जाते. अशाच पदार्थांपैकी एक म्हणजे प्रोटीनने भरलेली घरगुती चिक्की. बाजारात मिळणाऱ्या चिक्क्यांपेक्षा घरची चिक्की जास्त सुरक्षित, पौष्टिक आणि आपल्या आवडीनुसार तयार करता येते. (Make protein chikki at home, so tasty that even children will love to eat it)विशेषतः चणे वापरुन केलेली चिक्की ही प्रोटीन, फायबर आणि ऊर्जेचा उत्तम स्रोत ठरते. करायलाही सोपी आहे. पाहा कशी करावी. चणे प्रोटीनचा उत्तम स्रोत आहेत. त्यात फायबर, लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमही भरपूर असते. यामुळे पोट लवकर भरते, स्नायूंना बळकटी मिळते आणि रक्तातील साखर स्थिर राहण्यास मदत होते. चिक्कीत चणे वापरल्याने ही चिक्की लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी उपयुक्त ठरते.

साहित्य चणे, शेंगदाणे, तीळ, तूप, गूळ, वेलची पूड, भोपळ्याच्या बिया 

कृती१. सगळ्यात आधी चणे, शेंगदाणे, तीळ, ड्रायफ्रूट्स आणि बिया कढईत तूप घेऊन त्यावर मस्त परतून घ्यायचे. यामुळे त्याची चव खुलते आणि चिक्की अधिक पौष्टिक होते. भाजलेले सर्व साहित्य थोडे थंड झाल्यावर जाडसर कुटून घ्या. मिक्सरला वाटू नका. त्याची पूड करायची नाही फक्त तुकडे करायचे. अगदी बारीक पूड करु नका.

२. एका जाड तळाच्या कढईत तूप घालून त्यात किसलेला गूळ घ्यायचा. गूळ वितळून हलका फेस येऊ लागला की त्यात वेलची पावडर घाला. गॅस बंद करुन लगेच त्यात कुटलेले सर्व पदार्थ घालून मिक्स करायचे. एकजीव होऊ द्यायचे.  

३. ते मिश्रण जरा कोमट झाले की तूप लावलेल्या थाळीत ओतून थापून घ्या.  गरम असतानाच सुरीने हव्या त्या आकारात कापून घ्या. थंड झाल्यावर चिक्की घट्ट होते. आणि तुकडाही सहज पडतो. साठवून ठेवा आणि खा. 

ही चिक्की प्रोटीन, हेल्दी फॅट्स आणि फायबरने समृद्ध असते. चणे आणि शेंगदाण्यांमधील प्रोटीन स्नायूंसाठी फायदेशीर ठरते, तर तीळ व ड्रायफ्रूट्स हाडांसाठी आणि मेंदूसाठी उपयुक्त असतात. गूळ नैसर्गिक ऊर्जा देतो आणि लोहाची कमतरता भरून काढण्यास मदत करतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Homemade chickpea chikki: Healthy, tasty, children will forget chocolate.

Web Summary : Make nutritious chickpea chikki at home using simple ingredients like chickpeas, peanuts, sesame seeds, and jaggery. It's protein-rich, boosts energy, strengthens muscles, and is loved by all ages, offering a healthier alternative to chocolate.
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स