Join us

ना पराठा ना दशमी, करा बटाट्याची पोळी! भाजी काय चटणीसोबतही लागते छान, डब्यासाठी खास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2025 15:27 IST

make potato roti, It goes well with vegetables and chutney, children food, easy recipes : बटाट्याची अशी पोळी एकदा नक्की खा. चवीला मस्त करायला अगदी सोपी.

लहान मुलांच्या डब्यासाठी आणि सकाळच्या नाश्त्यासाठी एक मस्त पदार्थ करुन पाहा. ( make potato roti, It goes well with vegetables and chutney, children food, easy recipes )बटाट्याची पुरी आपण आवर्जून करतो मात्र बटाट्याची अशी पोळी नक्कीच नसेल केली. मस्त हलकी आणि मऊ अशी बटाटा पोळी करायला अगदी सोपी आहे. सामानही कमी लागते आणि करायला वेळही कमी लागतो.  

साध्या पोळी ऐवजी एकदा अशी पोळी करुन पाहा. लहान मुलांना हा पदार्थ नक्की आवडेल. त्यांच्यासाठी करताना मैदा कमी आणि कणिक जास्त वापरा. म्हणजे पोटाला बाधणारही नाही. तसेच मैदा न वापरता तांदळाचे पीठ वापरले तरी पोळी छान खमंग होते.   

साहित्य बटाटा, कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरे,  मीठ, गव्हाचे पीठ,  मैदा, पाणी, तेल, आलं, लसूण 

कृती१.  बटाटा उकडून घ्यायचा. त्यासाठी कुकरमध्ये बटाटे घ्यायचे आणि त्यात पाणी ओतायचे. कुकर लावायचा आणि बटाटे छान मऊ करायचे. कुकर उघडला की बटाटे काढून घ्यायचे आणि सोलून घ्यायचे. तसेच कुसकरून घ्यायचे. एकदम व्यवस्थित कुसकरायचे. 

२. कोथिंबीर बारीक चिरायची. तसेल लसणाच्या काही पाकळ्या सोलायच्या आणि चिरुन घ्यायच्या. हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करायचे. आले किसून घ्यायचे. उकडलेला बटाटा कुसकरुन झाल्यावर त्यात लसणाचे तुकडे तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. त्यानंतर किसलेले आले घालायचे. किसलेले आले घालायचे आणि सगळे पदार्थ एकजीव करायचे. 

३. त्यात मैदा घालायचा आणि गव्हाचे पीठही घालायचे. तसेच जिरे घालायचे आणि तेल गरम करुन घालायचे. छान मिक्स करायचे त्यासाठी थोडे पाणी वापरायचे आणि बटाट्यासोबत पीठ एकजीव करायचे. पोळी लाटू शकाल असेच पीठ मळायचे. ते मळून झाल्यावर त्याला तेल लावा आणि दहा मिनिटे झाकून ठेवा. नंतर पोळपाटाला पीठ लावा आणि पोळी लाटून घ्या. छान पातळ लाटा आकाराला जरा लहानच ठेवा म्हणजे तुटणार नाही आणि खमंग होईल. 

४. तव्याला तेल लावायचे आणि त्यावर लाटलेली पोळी भाजून घ्यायची. दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून झाल्यावर ताटात घ्यायची. गरमागरम बटाटा पोळी छान तिखट चटणीशी किंवा दह्याशी खा एकदम छान लागते. भाजीसोबतही खाऊ शकता आणि नुसतीही चविष्टच लागते.    

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स