Join us
Daily Top 2Weekly Top 5

कुडूमकुडूम बटाटा चिप्स खा पोटभर , ३ स्टेप्स- विकतपेक्षा भारी चिप्स करा घरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2026 17:04 IST

Make potato chips at home in 3 steps - Make chips that are better than packet food : घरीच करा चविष्ट बटाटा चिप्स. अगदी सोपी रेसिपी.

कुरकुरीत चिप्स सगळ्यांनाच आवडतात. काम करताना किंवा गप्पा मारताना , प्रवासातही असे चिप्स खायची अनेकांना सवय असते. अगदी १० रुपयांत विकत मिळतात त्यामुळे लोकं आवडीने खातात. पण विकतचे चिप्स आरोग्यासाठी चांगले नाहीत. घरच्या घरी कुरकुरीत बटाटा चिप्स करण्याची मजा काही वेगळीच असते. (Make potato chips at home in 3 steps - Make chips that are better than packet food )बाजारात मिळणाऱ्या चिप्सपेक्षा घरचे चिप्स अधिक ताजे, स्वच्छ आणि चविष्ट होतात. म्हणूनच अनेक जण आता घरीच चिप्स बनवणं पसंत करतात. थोड्या काळजीने आणि योग्य पद्धतीने केले तर हे चिप्स अगदी विकतच्या चिप्सपेक्षाही चविष्ट आणि दर्जेदार तयार होतात.

बटाटा चिप्स बनवण्यासाठी सर्वप्रथम चांगल्या दर्जाचे, ताजे आणि कडक बटाटे निवडणे महत्त्वाचे असते. बटाटे सोलून अगदी पातळ काप करणे ही पुढची महत्त्वाची पायरी. काप जितके पातळ तितके चिप्स अधिक कुरकुरीत होतात. काप केल्यानंतर ते लगेच पाण्यात टाकावेत, त्यामुळे त्यातील अतिरिक्त स्टार्च निघून जातो आणि चिप्स तळताना चिकटत नाहीत. काही वेळ पाण्यात भिजवल्यानंतर हे काप स्वच्छ पाण्याने धुऊन पूर्णपणे कोरडे करणे गरजेचे असते. ओलावा राहिला तर तेलात टाकताना तेल उडते आणि चिप्स मऊ होतात.

काप पाण्यातून काढून पातळ कॉटनच्या कापडावर पसरवायचे. वरतून दुसरं फडकं लावायचं आणि हाताने हलका दाब देऊन काप कोरडे करायचे. त्यातील जास्तीचे पाणी निघून जाते. तळताना त्रास होत नाही आणि मस्त कुरकुरीत चिप्स तयार होतात. 

चिप्स तळताना तेलाचे तापमान योग्य असणे खूप महत्त्वाचे आहे. खूप गरम तेलात टाकले तर चिप्स लगेच तपकिरी होतात पण आतून कच्चे राहू शकतात, तर थंड तेलात टाकले तर ते जास्त तेल शोषून घेतात. त्यामुळे मध्यम तापमानावर थोडे थोडे काप टाकून तळणे योग्य ठरते. चिप्स हलक्या हाताने ढवळत राहिल्यास ते एकमेकांना चिकटत नाहीत आणि समान तळले जातात. सोनेरी आणि कुरकुरीत झाल्यावर ते बाहेर काढून टिश्यू पेपरवर ठेवावेत, जेणेकरुन अतिरिक्त तेल निघून जाईल. चव वाढवण्यासाठी गरम चिप्सवर लगेच मीठ, तिखट किंवा चाट मसाला घातला तर मसाला व्यवस्थित लागतो. तुम्ही आपल्या आवडीनुसार पेरी-पेरी, काळं मीठ किंवा हर्ब्सही वापरु शकता. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चिप्स पूर्ण थंड झाल्यावरच हवाबंद डब्यात साठवावेत, नाहीतर ते मऊ पडू शकतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Homemade Crispy Potato Chips: Easy 3-Step Recipe, Better Than Store-Bought

Web Summary : Enjoy crispy homemade potato chips! Select quality potatoes, slice thinly, and soak to remove starch. Dry thoroughly, fry at medium heat until golden, and season to taste. Store in an airtight container.
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सबटाटा