Join us

फक्त २० मिनिटांत करा चमचमीत पाव बताका! खास पारंपरिक गुजराथी चव, रेसिपी अगदी सोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2025 17:09 IST

Make pav bataka in just 20 minutes! Special traditional Gujarati flavor, very easy recipe : पाव बताका करण्याची सोपी रेसिपी. नक्की करुन पाहा.

जशी पावभाजी भारतात फार फेमस आहे, तसेच गुजरातमध्ये पाव बताका हा पदार्थ प्रसिद्ध आहे. अगदी सोपी रेसिपी आहे. (Make pav bataka in just 20 minutes! Special traditional Gujarati flavor, very easy recipe)कमी पदार्थात करता येते आणि अगदी चविष्ट पदार्थ आहे. एकदा नक्की करुन पाहा. करायला फक्त ३० मिनिटे लागतात. तसेच पावासोबतच खा. चव जास्त छान लागते.  

साहित्यबटाटा, आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, धणे, जिरे, काश्मीरी लाल मिरची, तेल, पाणी, हळद, मीठ, लिंबू, गरम मसाला, हिंग, पाव , मोहरी

कृती१. बटाटा उकडून घ्यायचा. उकडून गार करायचा आणि मग कुस्करुन घ्यायचा. जास्त नाही फक्त थोडाच कुस्करा अगदी लगदा करु नका. तुकडे राहू देत. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्या. भरपूर कोथिंबीर घ्या. धुवायची आणि बारीक चिरायची. 

२. एका मिक्सरच्या भांड्यात लसणाच्या काही पाकळ्या घ्यायच्या त्यात आल्याचा लहान तुकडा घ्यायच्या. थोडे धणे घ्यायचे. तसेच त्यात थोडे जिरे घालायचे. तसेच त्याची पेस्ट तयार करायची. पाणी न वापरता पेस्ट तयार करायची. 

३. एका कढईत तेल घ्यायचे. तेल जरा गरम झाल्यावर त्यात चमचाभर जिरे घालायचे. तसेच लाल मिरचीचे तुकडे करु घालायचे. जरा परताचे. मग हिंग घाला आणि मोहरी घाला. फोडणी परतून घ्या. 

४. त्यात तयार केलेली पेस्ट घाला आणि परतून घ्या. त्यात चमचाभर हळद आणि गरम मसाला घाला.  छान परता नंतर मीठही घाला. तसेच थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला परतून घ्या मग त्यात पाणी ओता. मस्त उकळून घ्यायचे. मग त्यात बटाटा घाला. एक वाफ काढून घ्या. वरतून लिंबू पिळा. छान उकळी येऊ द्या.

५. तव्यावर तेल घाला आणि त्यावर पाव परतू घ्या. पावाला लाल तिखट लावले तर पावाची चव आणखी छान लागते. तसेच तेलाऐवजी बटर वापरु शकता. गरमागरम भाजी आणि पाव खा. 

English
हिंदी सारांश
Web Title : Quick & Easy Pav Bataka: A Traditional Gujarati Delight in Minutes!

Web Summary : Make Pav Bataka, a Gujarati favorite, in 20 minutes! This simple recipe uses minimal ingredients like potatoes, ginger, and garlic. Boil potatoes, prepare a spice paste, and create a flavorful gravy. Serve hot with buttered pav for a delicious meal.
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स