Lokmat Sakhi >Food > शिळ्या भाताचा करा पनीर पुलाव, मोजून दहा मिनिटांचे काम, चवीला चमचमीत आणि टेस्टी

शिळ्या भाताचा करा पनीर पुलाव, मोजून दहा मिनिटांचे काम, चवीला चमचमीत आणि टेस्टी

Make paneer pulao from left over rice, it takes about ten minutes to make, it tastes delicious : शिळ्या भाताचा करा पनीर पुलाव. अगदी काही मिनिटांचे काम.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2025 17:50 IST2025-06-22T17:50:10+5:302025-06-22T17:50:57+5:30

Make paneer pulao from left over rice, it takes about ten minutes to make, it tastes delicious : शिळ्या भाताचा करा पनीर पुलाव. अगदी काही मिनिटांचे काम.

Make paneer pulao from left over rice, it takes about ten minutes to make, it tastes delicious | शिळ्या भाताचा करा पनीर पुलाव, मोजून दहा मिनिटांचे काम, चवीला चमचमीत आणि टेस्टी

शिळ्या भाताचा करा पनीर पुलाव, मोजून दहा मिनिटांचे काम, चवीला चमचमीत आणि टेस्टी

शिळ्या भाताचा फोडणी भात घरोघरी केला जातो. नाश्त्यासाठी हा पदार्थ अगदी मस्त आहे. (Make paneer pulao from left over rice, it takes about ten minutes to make, it tastes delicious )पण शिळ्या भाताचे इतरही पदार्थ करता येतात. कधीतरी काही वेगळी नक्की करुन पाहायला हवे. पनीर पुलाव फार चविष्ट पदार्थ आहे. शिळ्या भाताचा झटपट पनीर पुलाव करणे अगदी सोपे आहे. पाहा काय करायचे.    

साहित्य 
कांदा, आलं, लसूण, हिरवी मिरची, जिरे, मोहरी, हिंग, तूप, कडीपत्ता, पनीर, दही, लाल तिखट, हळद, गरम मसाला, मीठ, सिमला मिरची, टोमॅटो

कृती
१. पनीरचे जाड तुकडे करायचे. जास्त पातळ तुकडे करु नका. पनीरचे तुकडे केल्यावर त्याला छान मॅरीनेट करायचे. मॅरीनेट करण्यासाठी एका खोलगट पातेल्यात दही घ्यायचे. दही फेटायचे. पाणी घालू नका. पातळ करायचे नाही फक्त फेटून घ्यायचे. त्यात चमचाभर मीठ घालायचे. गरम मसाला घालायचा. तसेच लाल तिखट घालायचे. हळद घालायची. हळद घातल्यावर ढवळून घ्यायचे.  सगळे मसाले एकजीव करून घ्यायचे. मग त्यात पनीरचे तुकडे घालायचे आणि त्याला मसाला लावायचा. तसेच झाकून ठेवायचे.  

२. कांदा लांब लांब चिरायचा. सिमला मिरचीही तशीच लांब लांब चिरायची. टोमॅटोचेही लांब काप करायचे. थोडं आलं घ्यायचं. लसणाच्या काही पाकळ्या घ्यायच्या. सोलून घ्यायच्या. हिरव्या मिरचीचे तुकडे घ्यायचे. आलं, लसूण, हिरवी मिरची अशी पेस्ट तयार करुन घ्यायची. 

३. एका कढईत तूप घ्यायचे. तुपावर जिरे परतायचे. जिरे छान फुलल्यावर त्यात मोहरी घालायची. मोहरी तडतडली की त्यात कडीपत्याची पाने घालायची. कडीपत्ता परतायचा.   मग त्यात कांदा घालायचा आणि कांदा मस्त गुलाबी परतायचा. नंतर सिमला मिरची घालायची आणि परतायची. शेवटी टोमॅटो घालायचा म्हणजे पाणी सुटले तरी चालते. सगळ्या भाज्या छान परतून झाल्यावर त्यात मीठ घालायचे हळद, लाल तिखट घालायचे आणि परतायचे. मॅरीनेट करत ठेवलेले पनीर घालायचे आणि परतायचे. पनीर अगदी छान परतायचे. पनीर परतून घ्यायचे. वाटल्याच जास्ती तूप घालायचे. खमंग वास सुटल्यावर त्यात शिजवलेला भात घालायचा आणि ढवळून घ्यायचे. छान परतायचे. झाकून ठेवायचे आणि एक वाफ काढायची.   

Web Title: Make paneer pulao from left over rice, it takes about ten minutes to make, it tastes delicious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.