लहान मुले भाजी शक्यतो आवडीने खातच नाहीत. मात्र काही ठराविक रेसिपी असतात ज्या ते आवडीने खातात. जसे की भेंडी. मुले भेंडी आवडीने खातात. जास्त तिखट नसलेली भाजी म्हणून भेंडी मुलांना पटकन रुचते. मात्र मुलांना भेंडी देताना तिची रेसिपी कशी करावी आणि ती शरीरासाठी कशी फायदेशीर ठरते, हे जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. भरपूर तेलात परतली तर चव तर मस्त लागते मात्र त्याचे पोषण कमी होते. (Make okra recipe in this way, tastes good and children will love it )लहान मुलांसाठी भेंडीची भाजी करताना ती शक्यतो साध्या पद्धतीने शिजवलेली असावी. भेंडी नीट धुऊन पूर्ण कोरडी करुन चिरली तर चिकटपणा कमी होतो. फार तिखट मसाले, जास्त तेल किंवा उग्र फोडणी टाळलेली बरी. मुलांना पचायला सोपी वाटावी यासाठी भेंडी मऊ शिजवलेली असावी. लहान मुलांना कुरुकुरीत भाज्या आवडतात. भेंडी कमी तेलात बराच वेळ परतायची ती छान कुरकुरीत होते. फक्त थोडे मीठ आणि थोडे तिखट घालायचे. तरी ही भाजी अगदी मस्त लागते.
भेंडी ही केवळ चविष्टच नाही तर मुलांच्या शरीरासाठी खूप फायदेशीर भाजी आहे. भेंडीमध्ये भरपूर फायबर असल्यामुळे मुलांचे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेसारख्या तक्रारी कमी होतात. लहान मुलांमध्ये पोट साफ न होण्याची समस्या अनेकदा दिसते, अशा वेळी भेंडी आहारात उपयुक्त ठरते. याशिवाय भेंडीमध्ये जीवनसत्त्व सी आणि अँटी ऑक्सिडंट्स असल्यामुळे मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. सतत आजारी पडणे, सर्दी-खोकला होणे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी भेंडीचा आहारात उपयोग होतो. भेंडीतील कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन के हाडांची वाढ मजबूत करतात, जे वाढत्या वयात अत्यंत आवश्यक असते.
भेंडी डोळ्यांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. त्यातील व्हिटॅमिन ए आणि इतर पोषक घटक दृष्टी चांगली ठेवण्यास मदत करतात. आजकाल लहान वयातच मोबाइल आणि टीव्हीचा वापर वाढल्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे झाले आहे. अशा वेळी भेंडीसारख्या भाज्यांचा आहार फायदेशीर ठरतो. भेंडी हलकी आणि कमी कॅलरीची असल्यामुळे मुलांचे वजन संतुलित ठेवण्यासही मदत होते. पोट भरते पण जडपणा जाणवत नाही, त्यामुळे ती रोजच्या आहारात सहज सामावून घेता येते. एकूणच, योग्य पद्धतीने केलेली भेंडी लहान मुलांसाठी चविष्ट, पचायला हलकी आणि आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे मुलांच्या आहारात भेंडीचा समावेश नियमितपणे करणे ही एक चांगली सवय ठरु शकते.
Web Summary : Make okra tasty for kids! Cook it simply, avoid strong spices and excess oil. Okra aids digestion, boosts immunity, strengthens bones, and benefits eye health. A healthy choice!
Web Summary : बच्चों के लिए भिंडी को स्वादिष्ट बनाएं! इसे सरल तरीके से पकाएं, तेज मसालों और अतिरिक्त तेल से बचें। भिंडी पाचन में मदद करती है, प्रतिरक्षा बढ़ाती है, हड्डियों को मजबूत करती है और आंखों के स्वास्थ्य के लिए फायदेमंद है। एक स्वस्थ विकल्प!