Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > मोड आलेल्या मुगाची करा अशी पौष्टिक उसळ, कोरडी चमचमीत उसळ-वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

मोड आलेल्या मुगाची करा अशी पौष्टिक उसळ, कोरडी चमचमीत उसळ-वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

Make nutritious green sprouts recipe, useful for weight loss, diet special, tasty and healthy : पौष्टिक मुगाची उसळ नक्की करा. वजन कमी होईल आणि चवही मस्त.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2025 14:21 IST2025-06-17T14:20:24+5:302025-06-17T14:21:23+5:30

Make nutritious green sprouts recipe, useful for weight loss, diet special, tasty and healthy : पौष्टिक मुगाची उसळ नक्की करा. वजन कमी होईल आणि चवही मस्त.

Make nutritious green sprouts recipe, useful for weight loss, diet special, tasty and healthy | मोड आलेल्या मुगाची करा अशी पौष्टिक उसळ, कोरडी चमचमीत उसळ-वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

मोड आलेल्या मुगाची करा अशी पौष्टिक उसळ, कोरडी चमचमीत उसळ-वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

पौष्टिक भाजी करायची असेल तर ही रेसिपी नक्की करुन पाहा. मूग फार पौष्टिक असतात. मोड आलेल्या मूगांची उसळ आपण करतो मात्र त्याची भाजी चवीला फार  मस्त लागते. (Make nutritious green sprouts recipe, useful for weight loss, diet special, tasty and healthy )एकदा नक्की करुन पाहा. सुकी करा किंवा मग रस्सा भाजी करा. करायला अगदी सोपी अशीही भाजी नक्की करा.    

साहित्य 
मूग, जिरं, तेल, मोहरी, टोमॅटो, हिंग, आलं, लसूण, हळद, लाल तिखट, मीठ, पाणी, गरम मसाला, कडीपत्ता, कोथिंबीर, कांदा  

कृती
१. मूग रात्रभर भिजत घालायचे. प्रत्येक वेळी मुगाला मोड येतातच असे नाही. त्यासाठी ते पाण्यात जास्त वेळासाठी भिजत घालावे लागतात. १२ ते १४ तासांनी मोड येतात. जाळीदार भांड्यात ठेवायचे.

२. कांदा छान बारीक चिरायचा. टोमॅटो पण बारीक चिरुन घ्यायचा. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. लसणाचे तुकडे करायचे. किंवा ठेचून घ्यायची. आल्याचा लहानसा तुकडा किसून घ्यायचा. त्यानंतर कोथिंबीर छान निवडायची आणि चिरुन ठेवायची. 

३. एका कढईत चमचाभर तेल घ्यायचे. त्यात मोहरी घालायची. मोहरी तडतडली की मग त्यात जिरे घालायचे. जिरे छान फुलू द्यायचे. जिरे फुलल्यावर त्यात कडीपत्त्याची पाने घालायची. कडीपत्ता छान परतायचा मग त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा छान गुलाबी परतायचा. कांदा परतून झाल्यावर त्यात टोमॅटो घालायचा. टोमॅटो परतायचा. नंतर त्यात चमचाभर हळद घालायची. चमचाभर लाल तिखट घालायचे. तसेच चवी पुरते मीठ घालायचे. चमचाभर गरम मसाला घालायचा आणि सगळे मसाले छान खमंग परतायचे. 

४. त्यात भिजलेले हिरवे मूग घालायचे आणि छान ढवळून घ्यायचे. त्यावर झाकण ठेवायचे आणि एक वाफ काढून घ्यायची. भाजी एकदम सुकली की त्यात थोडे पाणी घालायचे आणि ढवळायचे. पाणी मस्त वाटले की त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. तेल न वापरता केली तरी चालेल. तेला ऐवजी तूप वापरायचे किंवा मग फक्त पाणी घालून पदार्थ फक्त शिजवून घ्यायचे. 

Web Title: Make nutritious green sprouts recipe, useful for weight loss, diet special, tasty and healthy