आवळ्याचे लोणचे चवीला आंबट, तिखट आणि हलक्या गोडसर चवीचे असल्यामुळे जेवणात अप्रतिम लागते. पण त्याची खरी किंमत त्याच्या आरोग्यदायी गुणांमध्ये आहे. आवळा हा जीवनसत्त्व सी, लोह, कॅल्शियम, फायबर आणि अँटी ऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहे. तो शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतो, त्यामुळे सर्दी-खोकल्यापासून संरक्षण मिळते. (Make nutritious amla pickle in no time - delicious in taste and very beneficial for health)आवळ्यातील पोषक द्रव्ये त्वचेला चमकदार ठेवतात आणि केस गळती कमी करतात. त्याचबरोबर तो पचन सुधारतो, आम्लपित्तावर नियंत्रण ठेवतो आणि शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढतो. नियमित थोडं आवळ्याचं लोणचं खाल्ल्याने भूक वाढते आणि शरीराला नैसर्गिक उर्जा मिळते. म्हणूनच आवळ्याचे लोणचे केवळ चवीसाठी नव्हे तर आरोग्यासाठीही उत्तम आहे.
साहित्य
आवळा, पिवळी मोहरी, मेथी, हळद, हिंग, बडीशेप, लाल तिखट, मीठ, लिंबू
कृती
१. आवळा स्वच्छ धुवायचा. आवळा मस्त बारीक किसायचा. किसला नाही तरी चालेल मात्र किसलेल्या आवळ्याचे लोणचे जास्त चविष्ट लागते. किसून झाल्यावर झाकून ठेवायचा.
२. पिवळी मोहरी घ्यायची. जरा कुटाची. पूड मिळाली तर पूडच वापरा. अर्धा किलो आवळे असतील तर दोन चमचे मोहरी घ्यायची. त्यात चमचाभर मेथी घालायची. तसेच तव्यावर बडीशेप छान भाजायची आणि भाजलेली बडीशेप घ्यायची. जरा कुटायची. कुटल्यावर ती बडीशेपही मिश्रणात घालायची.
३. मिश्रणात चमचाभर हळद घाला. दोन ते तीन चमचे लाल तिखट घाला. तसेच चवी पुरते मीठ घाला आणि ढवळून घ्या. सगळे पदार्थ छान एकजीव करायचे. वाटीभर तेल गरम करायचे. जास्त तेल घेतले तरी चालेल. तयार मिश्रणात गरम तेल ओतायचे आणि झाकून ठेवायचे. चमच्याने ढवळायचे.
४. त्याला छान सुगंध यायला लागल्यावर त्यात किसलेला आवळा घालायचा. त्यात आवळा घालण्याआधी जरा पिळायचा. जास्त घट्ट पिळू नका, जास्तीचे पाणी काढून टाका म्हणजे लोणचं जास्त दिवस टिकेल. खराब होणार नाही.
५. लोणचं मस्त मुरत ठेवायचे. दोन तासांनी त्यात लिंबाचा थोडा रस घालायचा. छान ढवळायचे आणि हवाबंद डब्यात लोणचं साठवून ठेवायचे. दोन दिवसात लोणचं मस्त मुरेल.