कलाकंद ही एक फार लोकप्रिय अशी मिठाई आहे. मात्र सगळे विकतच आणतात. खरेतरी घरी ताजा मस्त कलाकंद करणे एकदम सोपे आहे. (make kalakand in just 3 ingredients, dessert recipes, Indian tasty sweets, delicious milk kalakand recipe )एकदा नक्की करुन पाहा. तीन ते पाच पदार्थांमधे मस्त रसाळ कलाकंद करता येतो. एकदा ही मिठाई करुन तर पाहा. प्रेमातच पडाल.
साहित्य दूध, साखर, पनीर, काजू, बदाम
कृती१. गॅसवर दूध गरम करत ठेवायचे. मंद आचेवर गरम करायचे. दूध गरम करायला जास्त वेळ लागेल. कारण दूध आटवून घट्ट आणि कमी होण्याची वाट पाहायची. दूध आटेपर्यंत एकीकडे पनीर किसून घ्यायचे. एक लिटर दूध असेल तर २५० ग्रॅम पनीर घ्यायचे.
२. दूध आटून घट्ट आणि कमी झाले की त्यात किसलेले पनीर घालायचे. पनीर आणि दूध छान ढवळायचे. मिक्स करायचे. एकजीव झाले पाहिजे. गॅस कमीच ठेवायचा. मधे बंद केला तरी चालेल. दूध आणि पनीर अजिबात करपणार नाही याची काळजी घ्यायची.
३. दूध आणि पनीर घट्ट झाल्यावर त्यात साखर घालायची. एक लिटर दूध असेल तर एक मोठी वाटी साखर घ्यायची. तुमच्या आवडीनुसार साखरेचे प्रमाण कमी जास्त करु शकता. साखर विरघळायची वाट पाहा. सतत ढवळा. ढवळले नाही तर खालून करपेल. त्यामुळे सतत ढवळायचे. साखर छान विरघळली की मिश्रण आणखी घट्ट होते.
४. काजू आणि बदामाचे तुकडे करायचे. पातळ आणि बारीक असे काप करायचे. ते एका खोलगट पातेल्याच्या तळाशी लावायचे. त्यावर तयार केलेले मिश्रण ओतायचे. व्यवस्थित घट्ट झाल्यावरच ओतायचे. पनीरमुळे छान रवाळ असे मिश्रण तयार होते. दोन तासांसाठी सेट होऊ द्यायचे. घाई असेल तर तासभर फ्रिजमध्ये ठेवायचे. बाहेर ठेवले तरी छान सेट होते. फ्रिजमध्ये ठेवायला हवेच असे नाही.
५. दोन तासांनी पातेलं उलटं करायचं आणि कलाकंद काढून घ्यायचा. त्याचे तुकडे करायचे आणि मस्त मऊ गोड कलाकंद खायचा आस्वाद घ्यायचा.