मूंगलेट हा मूगडाळीपासून तयार होणारा हलका, प्रोटीनने भरलेला आणि चविष्ट असा पदार्थ आहे. दिल्लीसारख्या शहरांमध्ये स्ट्रीट फूड म्हणून याची लोकप्रियता खूप वाढली असून हा पदार्थ नाश्त्याला किंवा हलक्या जेवणासाठी उत्तम पर्याय मानला जातो. (Make instant moonglate for breakfast, the recipe is very simple and tasty - a nutritious meal that fills the stomach)मूंगलेटची खासियत म्हणजे त्याचा मऊ, फुललेला आणि स्पॉन्जी पोत. हा पदार्थ करायला अगदी सोपा आहे. तसेच लहान मुलांना खाऊ म्हणून द्यायला अगदीच उत्तम आहे. पाहा मूंगलेट कसे करायचे.
साहित्य
मूगडाळ, मीठ, गाजर, कांदा, कोथिंबीर, लाल तिखट, लाल तिखट, हिरवी मिरची, लसूण, जिरे, तेल, बीट
कृती
१. मूगडाळ भिजत ठेवायची. अर्धा तास भिजवायची नंतर मिक्सरच्या भांड्यात घ्यायची. त्यात थोडे पाणी आणि चमचाभर मीठ घालायचे. थोडी हिरवी मिरची घालायची. मिरचीचे तुकडे घालायचे. पाणी अगदी थोडे घालायचे. मस्त पेस्ट करायची. डाळ छान वाटली जाईल याची काळजी घ्यायची.
२. गाजर सोलून घ्यायचे. नंतर जाडसर किसून घ्यायचे. कोथिंबीर निवडायची , स्वच्छ धुवायची आणि बारीक चिरायची. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्या. लसूण किसून किंवा ठेचून घ्यायचा. पेस्ट तयार करुन घ्यायचा. कांदा सोलून घ्यायचा. बारीक चिरायचा. बीट सोलून घ्यायचे आणि मग किसायचे. शिजवले तरी चालते न शिजवता घेतले तरी चालेल. फक्त किसून घेणे महत्त्वाचे.
३. वाटून घेतलेल्या डाळीत कांदा घालायचा. कोथिंबीर घालायची. तसेच गाजर घालायचे आणि चमचाबर लाल तिखट घालायचे. गरजेनुसार मीठ घालायचे. लसणाची पेस्ट घाला आणि चमचाभर जिरे घाला. किसलेले बीट घालायचे. सगळे मिश्रण छान एकजीव करायचे.
४. एका पॅनमध्ये थोडे तेल घ्यायचे. त्यावर तयार मिश्रणाचा जाड थर लावायचा. एका बाजूने खमंग परतून झाल्यावर पालटून घ्यायचे. दोन्ही बाजूंनी छान शिजू द्यायचे आणि जरा कुरकुरीत करायचे. मधे मऊ आणि वरतून खमंग होते.
