Join us
Daily Top 2Weekly Top 5

कुकरमध्ये करा हॉटेलस्टाइल हिरव्या वाटाण्याची उसळ - ३ शिट्ट्यांची कमाल-चव जबरदस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2026 14:12 IST

Make hotel style Hirva Vatana in a cooker - best recipe for usal : हिरव्या वाटाण्याची उसळ नक्की करा. चवीला जबरदस्त.

हिरव्या वाटाण्याची चविष्ट आणि घट्ट अशी उसळ महाराष्ट्रात फार लोकप्रिय आहे. हा पदार्थ करायला अगदीच सोपा आहे. तसेच एका कुकरमध्ये होतो. जास्त पूर्व तयारी नाही किंवा जास्त वेळही लागत नाही. आवडीचे मसाले आणि प्रमाण ठरवून करायची. भातासोबत छान लागते. पोळी- भाकरीसोबतही खाता येते. शिवाय त्यात फरसाण घालून एकदम मस्त लागते. पाहा कशी करायची. 

साहित्य हिरवा वाटाणा, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लाल मिरची, तेल, मोहरी, जिरे, तमालपत्र, धणे - जिरे पूड, हिरवी मिरची, आलं, लसूण, पाणी, कडीपत्ता, लाल तिखट, गरम मसाला, हळद 

कृती१. हिरवा वाटाणा रात्रभर भिजत ठेवायचा. कांदा सोलून छान बारीक चिरायचा. कांदा जरा जास्त घ्या. टोमॅटोही बारीक चिरुन घ्यायचा. आलं सोला आणि लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्या. आलं - लसूण पेस्ट तयार करा. लसणाच्या काही पाकळ्या ठेचून घ्यायच्या. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. कोथिंबीर बारीक चिरायची. 

२. एका कुकरमध्ये थोडे तेल घ्यायचे. तेल जरा गरम झाले की त्यात मोहरी घालायची. छान तडतडू द्यायची. नंतर त्यात कडीपत्ता आणि जिरे घाला. मस्त परतून घ्या. तमालपत्र घाला तसेच आलं लसूण पेस्ट घाला आणि जरा खमंग होऊ द्या. त्यात लसणाचे तुकडे आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला. परतून घ्या. 

३. कांदा घाला गुलाबी होईपर्यंत परता. नंतर त्यात टोमॅटो घाला आणि छान परतून घ्या. मसाला छान परतला की त्यात धणे - जिरे पूड घालायची. लाल तिखट घालायचे. हळद आणि चवीनुसार मीठ घालून ढवळून घ्यायचे. चवीनुसार गरम मसाला घाला आणि एक वाफ काढा. त्यात भिजवलेले वाटाणे घाला. गरजेनुसार पाणी घाला आणि कुकर लावा. वाटाणा छान शिजू द्या. कुकर उघडल्यावर एकदा उसळ उकळून घ्या. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. ढवळून घ्या. उकळी काढून जरा घट्ट होऊ द्यायची. जास्त पाणी असेल तर वाटाण्याला चव येत नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : Cooker Green Peas Usal: Hotel-style taste with 3 whistles!

Web Summary : Make delicious, thick green peas usal in a cooker quickly. Soak peas overnight. Sauté onions, tomatoes, and spices. Add peas, water, and pressure cook. Garnish with coriander. Enjoy!
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स