Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > नाश्त्याला करा गरमागरम आंबोळी - प्रमाण अगदी साधंच फक्त पीठ भिजवताना ही १ गोष्ट न चुकता करा

नाश्त्याला करा गरमागरम आंबोळी - प्रमाण अगदी साधंच फक्त पीठ भिजवताना ही १ गोष्ट न चुकता करा

Make hot traditional breakfast -make perfect Amboli just do this 1 thing while soaking the flour : आंबोळी करण्याची सोपी रेसिपी. योग्य प्रमाणासकट.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2026 13:07 IST2026-03-22T13:06:02+5:302026-03-22T13:07:39+5:30

Make hot traditional breakfast -make perfect Amboli just do this 1 thing while soaking the flour : आंबोळी करण्याची सोपी रेसिपी. योग्य प्रमाणासकट.

Make hot traditional breakfast -make perfect Amboli just do this 1 thing while soaking the flour | नाश्त्याला करा गरमागरम आंबोळी - प्रमाण अगदी साधंच फक्त पीठ भिजवताना ही १ गोष्ट न चुकता करा

नाश्त्याला करा गरमागरम आंबोळी - प्रमाण अगदी साधंच फक्त पीठ भिजवताना ही १ गोष्ट न चुकता करा

आंबोळी हा कोकणातील एक पारंपरिक आणि अतिशय हलका, पचायला सोपा पदार्थ आहे. नाश्त्यासाठी घरोघरी केलीच जाते आणि आवडीने खाल्ली जाते. (Make hot traditional breakfast -make perfect Amboli just do this 1 thing while soaking the flour)योग्य प्रमाणात साहित्य आणि नीट केलेली प्रक्रिया यामुळे आंबोळी मऊ, जाळीदार आणि चविष्ट बनते. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा हलक्या जेवणासाठी आंबोळी उत्तम पर्याय ठरतो.

परफेक्ट आंबोळी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तांदूळ आणि उडीद डाळ यांचं योग्य प्रमाण. साधारणपणे २ कप तांदूळ आणि अर्धा कप उडीद डाळ हे प्रमाण योग्य मानलं जातं. काही जण त्यात थोडे मेथीदाणे घालतात, ज्यामुळे आंबोळी अधिक मऊ होते आणि छान फुलते. तांदूळ आणि डाळ वेगवेगळे स्वच्छ धुऊन किमान ५-६ तास भिजत ठेवावेत.

भिजवलेले तांदूळ आणि डाळ एकत्र करून बारीक वाटून घ्यावेत. पीठ फार घट्ट किंवा फार पातळ नसावं, मध्यमसर असावं. वाटलेलं पीठ एका भांड्यात काढून त्यात चवीनुसार मीठ घालावं आणि ते किमान ७-८ तास आंबण्यासाठी ठेवावं. हवामानानुसार ही वेळ थोडी कमी-जास्त होऊ शकते. पीठ छान फुगलं आणि त्यात छोटे बुडबुडे दिसू लागले की आंबोळी बनवण्यासाठी ते तयार झालं आहे.

आता तवा गरम करून त्यावर हलकंसं तेल लावावं. तवा जास्त तापलेला नसावा, नाहीतर आंबोळी व्यवस्थित पसरत नाही. एक डावभर पीठ तव्यावर ओतून ते स्वतःहून पसरू द्यावं, मग चमच्याने जरासं पसरवा. डोशासारखं पसरवू नका. जाडसरच ठेवा. झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजू द्यावं. वरच्या बाजूला छान जाळीदार पोत दिसू लागला आणि खालची बाजू हलकी सोनेरी झाली की आंबोळी तयार होते. काही जणं एकाच बाजूने परततात. दोन्ही बाजूनही परतू शकता.  गरमागरम आंबोळी नारळाची चटणी, हिरवी चटणी किंवा गुळ-तूपासोबत खायला खूपच स्वादिष्ट लागते. योग्य प्रमाण, चांगलं आंबवलेलं पीठ आणि योग्य तापमानावर परतलेली आंबोळी खऱ्या अर्थाने परफेक्ट होते.

Web Title : परफेक्ट आंबोली बनाएं: सरल रेसिपी, घोल को सही किण्वित करना महत्वपूर्ण है।

Web Summary : आंबोली, एक हल्का कोंकणी व्यंजन, नाश्ते के लिए एकदम सही है। चावल और उड़द दाल का अनुपात और उचित किण्वन महत्वपूर्ण है। अच्छी तरह से किण्वित घोल से नरम, छिद्रयुक्त और स्वादिष्ट आंबोली बनती है। चटनी या गुड़ और घी के साथ गरमागरम परोसें।

Web Title : Make perfect Amboli: Simple recipe, key is fermenting the batter right.

Web Summary : Amboli, a light Konkani dish, is perfect for breakfast. The key is the ratio of rice to urad dal and proper fermentation. A well-fermented batter results in soft, porous, and delicious Amboli. Serve hot with chutney or jaggery and ghee.