Lokmat Sakhi >Food > कोकणातील बसस्टॅण्डवर मिळतो अगदी तसाच आलेपाक करा घरी - आल्याची पौष्टिक वडी करायची सोपी रेसिपी

कोकणातील बसस्टॅण्डवर मिळतो अगदी तसाच आलेपाक करा घरी - आल्याची पौष्टिक वडी करायची सोपी रेसिपी

Make ginger candy at home, Easy and nutritious recipes, must try : आल्याची वडी करा झटपट. मस्त रेसिपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2025 13:12 IST2025-09-12T13:07:17+5:302025-09-12T13:12:59+5:30

Make ginger candy at home, Easy and nutritious recipes, must try : आल्याची वडी करा झटपट. मस्त रेसिपी.

Make ginger candy at home, Easy and nutritious recipes, must try | कोकणातील बसस्टॅण्डवर मिळतो अगदी तसाच आलेपाक करा घरी - आल्याची पौष्टिक वडी करायची सोपी रेसिपी

कोकणातील बसस्टॅण्डवर मिळतो अगदी तसाच आलेपाक करा घरी - आल्याची पौष्टिक वडी करायची सोपी रेसिपी

आल्याची वडी ही केवळ चविष्ट गोड पदार्थ नसून आरोग्यासाठी उपयुक्त असा नैसर्गिक उपाय मानला जातो. आलं शरीरात उष्णता निर्माण करतं आणि त्यामुळे थंड हवामानात सर्दी-खोकला, अंगदुखी किंवा थंडी वाजणे यांसारख्या त्रासांपासून बचाव करण्यासाठी आल्याची वडी उपयुक्त ठरते. (Make ginger candy at home, Easy and nutritious recipes, must try )पचनशक्ती सुधारण्यासाठी आलं प्रभावी आहे आणि जेवणानंतर थोडीशी आल्याची वडी खाल्ल्याने अन्न नीट पचते. गॅसेस आणि पोटफुगीसारख्या समस्या कमी होते. शरीरात जमा होणारे विषारी घटक बाहेर टाकण्याची ताकद आलं देतं, त्यामुळे वडी नियमित खाल्ल्यास शरीर शुद्ध राहते आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. घरी आल्याची वडी करणे अगदीच सोपे आहे पाहा कसा करायचा. 


साहित्य 
आलं, साखर, तूप, सैंधव मीठ, वेलदोड्यांची पूड 

कृती
१. आल्याची सालं काढून घ्यायची. आलं सोलून घ्यायचं. नंतर आल्याचा किस करायचा. वाटीभर आल्याचा किस घेतला असेल तर त्यासाठी दीड ते दोन वाटी साखर घ्यायची. म्हणजे वडी एकदम परफेक्ट प्रमाणात होते. आलं छान ताजंच घ्या. म्हणजे वडीला वास लागणार नाही. 

२. एका मिक्सरच्या भांड्यात वाटीभर आल्याचा किस घ्यायचा. त्यात दोन वाटी साखर घालायची. पाणी वगैरे काहीही न घालता मस्त पेस्ट तयार करुन घ्यायची. एकजीव छान पेस्ट करायची.

३. एका कढईत दोन ते तीन चमचे तूप घ्यायचे. तूप जरा गरम झाले की त्यात तयार पेस्ट घालायची. छान परतायचे. सतत ढवळायचे. म्हणजे मिश्रण करपणार नाही आणि कढईला चिकटणार नाही. त्यात चमचाभर सैंधव मीठ घालायचे. तसेच चमचाभर वेलदोड्यांची पूड घालायची. छान ढवळून घ्यायचे. एकजीव करायचे आणि मग मिश्रण जरा आटू द्यायचे. 

४. मिश्रण आटल्यावर एका ताटलीला तूप लावायचे. तसेच वाटीच्या तळालाही थोडे तूप लावायचे. मिश्रण गरम असतानाच ताटलीत काढून घ्यायचे. वाटीच्या मदतीने पसरवून घ्यायचे. जाडसर पसरा म्हणजे वडी घट्ट होईल आणि तुकडा पडणार नाही. मिश्रण जरा कोमट झाल्यावर सुरीने वड्या पाडून घ्यायच्या. नंतर मिश्रण पूर्ण गार व्हायची वाट पाहायची. गार झाल्यावर वड्या काढून घ्यायच्या. 
 

Web Title: Make ginger candy at home, Easy and nutritious recipes, must try

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.