Join us

दहा मिनिटांत करा हा चमचमीत लसूण पराठा, डब्यासाठी तर एकदम मस्त रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2025 14:02 IST

make garlic paratha in just ten minutes, a great recipe for tiffin as well, easy recipes, paratha recipe : नाश्त्याला करा मस्त चविष्ट लसूण पराठा. एकदम सोपी पद्धत. चवीला लय भारी.

अगदी सोपी आणि झटपट करता येणारी रेसिपी शोधत असाल तर एकदा लसूण पराठा करुन पाहा. (make garlic paratha in just ten minutes, a great recipe for tiffin as well, easy recipes, paratha recipe )इतर पराठ्यांसाठी जसे सारण करायला लागते तेवढे काम न करता झटपट करता येते. एकदम चविष्ट रेसिपी आहे.   

साहित्य लसूण, कोथिंबीर, तांदळाचे पीठ, बटर , कणीक, आलं, हिरवी मिरची, लाल तिखट, मीठ, पांढरे तीळ, पाणी, दही, तेल 

कृती१. लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या. लसूण भरपूर घ्यायचा. लसणाची चव प्रत्येक घासाल लागेल एवढा लसूण सोलून घ्यायचा. लसणाच्या पाकळ्या सोलून झाल्यावर त्याचे तुकडे करायचे. सुरीने चिरायचे आणि मग जरा ठेचायचे. अगदी पेस्ट करायची नाही. फक्त जरा ठेचायचे. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे आणि ते ही जरा ठेचायचे. हिरवी मिरची अगदी पेस्ट होईल इतकी ठेचली तरी चालेल. 

२. कोथिंबीर निवडून घ्यायची. निवडून झाल्यावर मस्त चिरायची. छान बारीक चिरायची. आवडत असेल तर कांदा घालू शकता. इतरही भाज्या घालू शकता. फार सोपी आणि साधी रेसिपी आहे. आवडीनुसार करायची. वाटीभर तांदळाचे पीठ घ्यायचे. त्याहून जरा जास्त कणीक घ्यायची. थोडे चमचाभर तेल गरम करायचे. गरम केल्यावर पीठात  घालायचे. त्यात मीठही घालायचे आणि थोडे लाल तिखट घालून पीठ छान मळून घ्यायचे. पीठ मळण्यासाठी त्यात हळूहळू पाणी घाला. तसेच चमचाभर दही घाला. पीठ छान मळून घ्या. जरा सैलसर मळायचे. अति घट्ट नको.

३. ठेचलेली लसूण, हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडे लाल तिखट आणि पांढरे तीळ हे सारे पदार्थ जरा बटरवर परतून घ्यायचे. लसूण छान खमंग लालसर परतायचा. सगळे पदार्थ परतून झाल्यावर जरा हातानेच चुरायचे. एकजीव करायचे. 

४. पीठाच्या लाट्या करायच्या. लाटी जरा लाटायची आणि त्यावर तयार लसणाची पेस्ट लावायची. पुन्हा लाटी गोल करायची आणि मग पुन्हा लाटायची. जाडसर लाटा एकदम पातळ पोळी करायची. मध्यम आकाराची लाटून झाल्यावर तव्यावर परता. परतण्यासाठी बटर वापरा.  दोन्ही बाजूनी मस्त खमंग परतायची. जरा कुरकुरीत केली तरी आणखी मस्त लागेल.  

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स