विविध प्रकारची लोणची करण्याच्या रेसिपी आपण नक्कीच करतो. त्यापैकी एक प्रकार म्हणजे गाजराचे लोणचे. हे करायला अगदी सोपे असते, तसेच झटपट होते. तिखट-आंबट-खारट अशा चवींचा सुरेख संगम असलेले हे लोणचे साध्या जेवणालाही खास करते. (Make fresh carrot pickle - even a simple meal will feel like a feast, a spoonful of pickle is a game changer)भाजी-पोळी असो, वरण-भात असो किंवा साधी भाजी-भाकरी गाजराच्या लोणच्याची जोड असेल तर जेवणात मज्जा येते.
गाजराला नैसर्गिक गोडसर चव असते. त्यात मीठ, मसाले आणि आंबटपणा मिसळला की ही गोडी आणखी खुलून येते. त्यामुळे गाजराचे लोणचे तिखट असूनही तोंडाला झोंबणारे नसते. उलट प्रत्येक घासानंतर पुन्हा थोडे लोणचे घ्यावेसे वाटते. त्यामुळे हे लोणचं नक्की करुन पाहा. अगदी सोपे आहे.
साहित्य
गाजर, पाणी, मीठ, धणे, जिरे, मोहरी, बडीशेप, कांद्याचं बी, हळद, लाल तिखट, आमचूर पूड, तेल, हिंग
कृती
१. गाजर सोलून घ्यायचे, गाजराचे मध्यम आकाराचे तुकडे करायचे. जास्त पातळ नको म्हणजे ते तुटणार नाहीत. गाजर कोमट पाण्यात भिजवायचे. म्हणजे जरा मऊ होते. दोन ते तीन पाण्यातून काढायचे.
२. एका कढईत थोडे धणे घ्यायचे. तेवढीच बडीशेप घ्यायची. तसेच जिरेही घ्यायचे. त्यात थोडी मोहरी घालायची. मस्त भाजायचे. मसाला सुगंधी होईपर्यंत भाजायचा. नंतर गार करत ठेवायचा. छान गार झाल्यावर मिक्सरमधून वाटून मसाला तयार करायचा.
३. एका खोलगट आणि पसरट कढईत थोडे तेल घ्यायचे. तेल जरा तापले की त्यात कांद्याचं बी घाला आणि परतून घ्या. नंतर त्यात गाजराचे तुकडे घालायचे. ते मस्त परतायचे. त्यात तयार केलेला मसाला घालायचा. थोडी हळद घालायची. तसेच थोडे लाल तिखट घालायचे. आमचूर पूड घालायची. हिंग घालायचे आणि चवीनुसार मीठ घालायचे.
४. मस्त शिजवायचे आणि मग गार करायचे. गार झाल्यावर हवाबंद डब्यात काढून ठेवायचे. चवीला मस्त लागते. तसेच करायला अगदीच सोपे आहे.
